Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : जगातील ‘या’ देशांमध्ये वेगाने वाढलाय कोरोना.. WHO ने दिलीय महत्वाची माहिती..

दिल्ली : जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मागील सात दिवसात जागतिक पातळीवर कोरोनाच्या नवीन रुग्णांची (Corona patient) संख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे. तरीही मृत्यूच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) आरोग्य एजन्सीच्या अहवालानुसार, कोरोना संसर्गाची 1.2 कोटींपेक्षा जास्त साप्ताहिक प्रकरणे सापडले तर मृत्यूंची संख्या 33,000 होती, जे मृत्यू दरात 23 टक्के घट दर्शवते.

Advertisement

जानेवारीपासून जगभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत परंतु मागील सात दिवसात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. अधिक संक्रामक ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट आणि युरोप, उत्तर अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये COVID-19 संबंधित नियम मागे घेतल्यामुळे रुग्ण वाढल्याचे मानले जाते. आरोग्य अधिकार्‍यांनी वारंवार सांगितले आहे, की कोरोना व्हायरसच्या आधीच्या प्रकारांपेक्षा ओमिक्रॉनमुळे रोगाची सौम्य लक्षणे दिसून येतात आणि बूस्टर डोससह लसीकरण (Vaccination) अधिक संरक्षण प्रदान करते.

Advertisement

पश्चिम पॅसिफिक हा जगातील एकमेव प्रदेश राहिला आहे जिथे कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे वाढत आहेत, मागील सात दिवसात आणि त्याआधीच्या काही दिवसांमध्ये कोरोना प्रकरणात 21 टक्के वाढ नोंदली गेली. मागील सात दिवसांतील आकडेवारीनुसार, नवीन संक्रमणांची संख्या युरोपमध्ये स्थिर राहिली आणि इतरत्र रुग्ण घटले. डब्ल्यूएचओने इशारा दिला, की अनेक देशांनी कोरोना चाचणी करणे कमी केल्यामुळे संसर्गाची अनेक प्रकरणे आढळून येणार नाहीत आणि नवीन प्रकरणांच्या संख्येच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.

Loading...
Advertisement

आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे प्रमुखांनी सांगितले, की अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध एकतर कमी केले गेले किंवा मागे घेण्यात आले. यामुळे सध्याच्या दिवसात ब्रिटेन, फ्रान्स, इटली आणि जर्मनी या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णात अतिशय वेगाने वाढ झाली आहे. ही परिस्थिती धोकादायक आहे. कारण, कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत निर्बंध कमी करणे किंवा काढून टाकणे बरोबर होणार नाही, असेच जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याद्वारे स्पष्ट होत आहे.

Advertisement

युद्ध तर होतेच, आता चीनचा कोरोनाही आलाय..! पहा, जागतिक बाजारात कच्च्या तेलाला ‘कशाचा’ बसलाय झटका..

Advertisement

‘WHO’ ने श्रीमंत देशांना फटकारले..! ‘त्यामुळेच’ युरोपात वाढतोय कोरोना; पहा, कोरोनाने कसा घेतलाय फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply