Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘नाटो’ च्या नव्या घोषणेने रशिया भडकणार; पहा, युक्रेनच्या मदतीसाठी कोणता प्लान केलाय..?

दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात सुरू केलेले युद्ध (Russia Ukraine War) अजूनही संपलेले नाही. या युद्धात अतोनात नुकसान झाल्यानंतरही युक्रेनने शरणागती पत्करलेली नाही. रशियासारख्या ताकदवान देशाला युक्रेन (Ukraine) टक्कर देत आहे. या युद्धात अमेरिका आणि युरोपिय देश युक्रेनला मदत करत आहेत. त्यानंतर आता अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटो (NATO) या संघटनेने एक मोठी घोषणा केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरुच आहे. आता नाटो संघटनेने युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. कारण, रशिया युक्रेनवर मोठा हमला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने नाटो संघटनेने ही घोषणा केली आहे.

Advertisement

नाटो देशांनी युक्रेनला अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. नाटो 4 नवीन युद्ध गट तैनात करेल. पूर्व सदस्य देशांमध्ये 4 युद्ध गट तैनात करेल. युक्रेनचे प्रतिनिधी रशियाबरोबर चर्चेत चार भागात नवीन मानवतावादी कॉरिडॉर स्थापन करण्याची मागणी करत आहेत.

Advertisement

सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीच्या हवाल्याने म्हटले आहे की, युक्रेन मध्य युक्रेनमधील कीव शहर, पूर्व युक्रेनमधील खार्किव आणि देशाच्या दक्षिणेकडील परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नवीन मार्ग सुरू करण्याची मागणी करत आहे. रशियन सैन्याने वेढलेल्या मारियुपोल शहरातून मंगळवारी एकूण 7,026 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. शहरात युक्रेनियन आणि रशियन सैन्यांमध्ये युद्ध सुरू आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशियाकडून युक्रेनियन लोकांना त्रास दिल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनी लोकांना त्यांच्याकडील फोन आणि कागदपत्रे जप्त करण्यात येत आहेत, असा आरोप होत आहे. डेली मेलच्या (Daily Mail) वृत्तानुसार, आतापर्यंत अनेक हजार लोकांना सायबेरियात (Siberia) नेण्यात आले आहे. मारियुपोल सिटी कौन्सिलने दावा केला की युक्रेनियन नागरिकांना प्रथम ‘फिल्ट्रेशन कॅम्प’ मध्ये ठेवण्यात आले होते. नंतर रशियामधील “दुर्गम शहरांमध्ये” निर्वासित करण्यात आले होते. रशियन वृत्तसंस्थांनी वृत्त दिले आहे, की मारियुपोल येथून शेकडो निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या बस रशियात आल्या होत्या. मॉस्को (Moscow) अधिकार्‍यांनी असेही सांगितले, की 280 हून अधिक युक्रेनियन लोकांना मारियुपोलमधून बाहेर काढण्यात आले आहे.

Advertisement

रशियाला ‘त्या’ संघटनेतून बाहेर काढण्याचा अमेरिकेचा डाव; चीनने अमेरिकेला दिलाय ‘हा’ इशारा..

Advertisement

Russia-Ukraine War : युक्रेनने ‘NATO’ ला पुन्हा दिलाय ‘त्या’ संकटाचा इशारा; नाटोलाही आहे ‘हा’ मोठा धोका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply