दिल्ली : देशतील 5 राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र येत्या काही दिवसांत ही समस्या आणखी वाढणार आहे. कारण, रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) 2.4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 118 च्या जवळ पोहोचल्या आहेत. गेल्या आठवड्यात कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले होते. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेट क्रूड ऑइल पुन्हा $118 प्रति बॅरलच्या वर व्यापार करत आहे.
युरोपियन संघाकडून (European Union) रशियन पेट्रोलियम उत्पादनांवर बंदी येण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. युरोपियन युनियन या आठवड्यात रशियन क्रूड खरेदीवर स्थगितीचा विचार करू शकते. रशियावर याआधीच अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, हा निर्णय घेणे तितकेसे सोपे नाही.
रशियाने युक्रेनमधील युद्ध थांबवले नाही, तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात, ज्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. खरं तर, रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. रशिया युरोपला (Europe) 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा करतो. भारत रशियाकडून कच्चे तेलही खरेदी करतो. जगात पुरवल्या जाणाऱ्या 10 बॅरल तेलामध्ये एक डॉलर रशियाकडून येतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने किमती आणखी वाढू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती दोन कारणांमुळे वाढल्या आहेत. पहिले कारण रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरे कारण म्हणजे चीनमध्ये (China) कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे. रशिया आणि युक्रेनचे अधिकारी एकमेकांना भेटत आहेत, तरीदेखील बैठकांमध्ये काहीच निर्णय होत नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त करत आहेत, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.
अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. पाहा आज किती पैशांनी झालीय वाढ…?