Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : युक्रेनी लोकांकडील कागदपत्रे आणि स्मार्टफोन जप्त; रशियावर होताहेत गंभीर आरोप..

दिल्ली : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अजूनही सुरुच आहे. या युद्धामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. आता तर या देशात अनेक ठिकाणी अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच आता रशियाकडून युक्रेनियन लोकांना त्रास दिल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनी लोकांना त्यांच्याकडील फोन आणि कागदपत्रे जप्त करण्यात येत आहेत, असा आरोप होत आहे.

Advertisement

डेली मेलच्या (Daily Mail) वृत्तानुसार, आतापर्यंत अनेक हजार लोकांना सायबेरियात (Siberia) नेण्यात आले आहे. मारियुपोल सिटी कौन्सिलने दावा केला की युक्रेनियन नागरिकांना प्रथम ‘फिल्ट्रेशन कॅम्प’ मध्ये ठेवण्यात आले होते. नंतर रशियामधील “दुर्गम शहरांमध्ये” निर्वासित करण्यात आले होते. रशियन वृत्तसंस्थांनी वृत्त दिले आहे, की मारियुपोल येथून शेकडो निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या बस रशियात आल्या होत्या. मॉस्को (Moscow) अधिकार्‍यांनी असेही सांगितले, की 280 हून अधिक युक्रेनियन लोकांना मारियुपोलमधून बाहेर काढण्यात आले आहे.

Advertisement

मारियुपोलचे महापौर म्हणाले, की “आज कब्जा करणारे जे करत आहेत ते जुन्या पिढीला परिचित आहे. ज्यांनी दुसऱ्या महायुद्धातील भयानक घटना पाहिल्या. 21 व्या शतकात लोकांना जबरदस्तीने पकडले जाऊ शकते याची कल्पना करणे कठीण आहे. दुसऱ्या देशात नेले जात आहे.” रशियन सैन्याने वेढा टाकल्यामुळे ऊर्जा, अन्न आणि पाण्याचा पुरवठा खंडित केल्यामुळे युक्रेनचे मारियुपोल शहर आणीबाणीच्या मार्गावर आहे. रशियन कर्नल-जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी मागणी केली, की युक्रेनियन सैनिक आणि परदेशी सैन्याने आपली शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे, जेणेकरून शहरात अडकलेल्या हजारो नागरिकांची सुटका करता येईल.

Loading...
Advertisement

अखेर अमेरिकेने खरे काय ते सांगितलेच..! रशियाबाबत भारताच्या धोरणाबाबत दिलीय ‘ही’ प्रतिक्रिया..

Advertisement

स्पष्टपणे सांगा, की रशियाला घाबरलात..! संतापलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘या’ संघटनेला फटकारले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply