आतातरी आमचे म्हणणे ऐका, नाहीतर.. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला आणखी एक इशारा; पहा, नेमके काय म्हटलेय
दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी रशियाला पुन्हा एकदा इशारा दिला. झेलेन्स्की यांनी रशियाला स्पष्ट शब्दात सांगितले की, रशियाने त्यांचे म्हणणे आता तरी ऐकावे अन्यथा त्याचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतील. ते म्हणाले की रशियासाठी वाटाघाटी हा एकमेव मार्ग आहे.
झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, आता आधिक उशीर न करता संवादाची वेळ आली आहे. आता सर्वांनी माझे ऐकावे अशी माझी इच्छा आहे. विशेषतः रशियात लोकांनी माझे म्हणणे ऐकावे. आता संवाद साधण्याची वेळ आली आहे. युक्रेनला प्रादेशिक अखंडता आणि न्याय पुन्हा देण्याची वेळ आली आहे, अन्यथा रशियाला असे नुकसान सहन करावे लागेल ज्यामुळे अनेक पिढ्यांवर परिणाम होईल.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, रशियन सैन्याने मोठ्या शहरांना वेढा घातला आहे. त्यांना अशी दयनीय परिस्थिती निर्माण करायची आहे की युक्रेनच्या नागरिकांना त्यांना सहकार्य करणे भाग पडेल. तथापि, झेलेन्स्की म्हणाले, की ही रणनिती यशस्वी होणार नाही आणि रशियाने युद्ध संपवले नाही तर दीर्घकाळ त्याचे नुकसान होईल. ही पूर्णपणे पूर्व नियोजित चाल आहे.
झेलेन्स्की यांनी निदर्शनास आणले, की युक्रेनमध्ये सात मानवतावादी कॉरिडॉर आहेत. यापैकी सहा सुमीमध्ये आणि एक डोनेत्स्कमध्ये आहे. युक्रेनच्या अध्यक्षांनी सांगितले की आतापर्यंत 9,000 हून अधिक लोकांनी मारियुपोल शहर सोडले आहे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. रशियाने अनेक शहरांना मानवतावादी मदतीचा पुरवठा थांबवला आहे. ही पूर्णपणे विचारपूर्वक केलेली रणनिती आहे. मारियुपोल येथील थिएटरवर झालेल्या हमल्याबाबत त्यांनी सांगितले की, त्यातील काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र किती जणांचे प्राण गेले आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
भारत-चीनबाबत आलाय नवा अहवाल.. रशिया-युक्रेन युद्धाचा दोघांवर ‘असा’ होणार परिणाम; जाणून घ्या..
Russia Ukraine War : .. तर युक्रेनवर येणार आणखी मोठे संकट; पहा, कुणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..