Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तान तालिबान सरकारला मान्यता देणार.. पण, कधी..? ; पहा, काय उत्तर दिलेय पाकिस्तानने..

दिल्ली : अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला (Taliban Government) कधी मान्यता देणार हे आता पाकिस्तानने (Pakistan) सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रातील (United Nations) पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी म्हटले आहे की, तालिबान राजवटीला पाकिस्तान तेव्हाच मान्यता देईल जेव्हा या मुद्द्यावर विशेषत: प्रादेशिक देशांमध्ये एकमत होईल. 17 मार्च रोजी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये तालिबान राजवटीला राजनैतिक मान्यता देण्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Advertisement

या मुद्द्यावर 15 पैकी 14 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर रशिया (Russia) मतदानापासून दूर राहिला. मतदानापासून दूर राहिल्याबद्दल, रशियाने सांगितले की संयुक्त राष्ट्रांच्या उपस्थितीसाठी यजमान देशाकडून संमती मिळविण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून त्यांना मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Advertisement

तालिबान राजवटीला पाकिस्तान सुरुवातीपासूनच पाठिंबा देत आहे. तालिबान सरकारला अन्य देशांनी मान्यता द्यावी यासाठीही पाकिस्तानने प्रयत्न केले आहेत. परंतु, पाकिस्तानने अद्याप तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या मतदानाचा या मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेवर परिणाम होईल का, असे विचारले असता, पाकिस्तानचे राजदूत म्हणाले, की आम्ही तालिबानला तेव्हाच मान्यता देऊ, जेव्हा एकमत असेल, विशेषत: प्रादेशिक देशांमध्ये.

Advertisement

अफगाणिस्तानच्या सहा शेजारी देशांची एप्रिलमध्ये चीनमध्ये (China) बैठक होत आहे. या बैठकीत तालिबान सरकारला मान्यता देण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत चीन, इराण, पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान सहभागी होणार आहेत. या बैठकीत तालिबानचे शिष्टमंडळही सहभागी होणार आहे. वृत्तानुसार, रशियाही या बैठकीत सहभागी होऊ शकतो, मात्र अद्याप याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

Loading...
Advertisement

पाकिस्तानचे राजदूतांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावात अफगाणिस्तानची अमेरिकेतील संपत्ती प्रतिबंध मुक्त करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिशनला मानवाधिकार आणि मानवतावादी मदतीवर अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.

Advertisement

तालिबान्यांसाठी खुशखबर..! संयुक्त राष्ट्रांनी तालिबानबाबत सुरू केलाय ‘हा’ विचार.. जाणून घ्या, काय आहे कारण..?

Advertisement

अर्र.. तालिबानच म्हणतोय युद्ध नको..! पहा, तालिबान्यांनी रशिया-युक्रेनला काय केलेय आवाहन..

Advertisement
Advertisement

Leave a Reply