Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : वेगळ्या पद्धतीने तयार करा टेस्टी कांदा कचोरी; रेसिपीही आहे एकदम खास..

अहमदनगर : जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी स्वादिष्ट आणि वेगळे काहीतरी बनवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी कांदा कचोरीची रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाइल स्वादिष्ट आणि कुरकुरीत कांदा कचोरी कशी बनवायची ते सांगणार आहोत. कचोरीचे विविध प्रकार आहेत. तरी देखील ही वेगळ्या प्रकारची कचोरी आहे, आणि नाश्त्यासाठी एक वेगळा पर्याय ठरेल. चला तर मग जाणून घेऊ या, स्वादिष्ट आणि कुरकुरीत कांदा कचोरी कशी तयार करतात.

Advertisement

साहित्य- मैदा 2 वाट्या, मीठ अर्धा चमचा, तूप 5 चमचे, तेल 5 चमचे, पाणी आवश्यकतेनुसार, तळण्यासाठी तेल.

Advertisement

कचोरी मसालासाठी साहित्य- तेल 4 चमचे, हिंग अर्धा चमचा, बारीक केलेले अद्रक 1 चमचा, बारीक केलेली हिरवी मिरची 1 चमचा, जिरे 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, बारीक केलेला कांदा 1½ कप, काळे मीठ 1/4 चमचा, अर्धा चमचा, चिमूटभर, हळद अर्धा चमचा, मिरची पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ,

Loading...
Advertisement

रेसिपी
सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात हिंग, अद्रक, हिरवी मिरची, जिरे आणि बडीशेप टाका. नंतर कांदा, काळे मीठ, मिरपूड, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर कांदा शिजू द्या. एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करा. पीठ मळून घेण्यासाठी मैदा, मीठ, तूप आणि तेल नीट मिसळून घ्या. खूप मऊ पीठ करण्यासाठी पुरेसे पाणी टाका. त्यानंतर पीठ मळून घ्या आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा.

Advertisement

त्यानंतर पिठाचे गोळे तयार करुन लाटून घ्या. आता त्यांना दाबून सपाट करा आणि त्यात कांद्याचे सारण भरा. त्यानंतर गोळे तयार करुन घ्या. एका भांड्यात तेल मध्यम गरम होईपर्यंत गरम करा. भरलेल्या पिठाचे गोळे हलके दाबून चपटे करा आणि नंतर तेलात सोडा. आणि सोनेरी होईपर्यंत तळा. त्यानंतर गरमागरम कांदा कचोरी तयार आहे. चटणीबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

संडे स्पेशल : घरच्या घरीच बनवा कांद्यापासून मसालेदार कचोरी.. ही घ्या सर्वात सोपी रेसिपी

Advertisement
Advertisement

Leave a Reply