Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चीननंतर आता ‘या’ देशात आलेत कोरोनाचे जुने दिन; सापडलेत तब्बल ‘इतके’ रुग्ण

दिल्ली : चीननंतर, दक्षिण कोरिया (South Korea) आता सर्वात वाईट COVID-19 उद्रेकाचा सामना करत आहे. बुधवारी दक्षिण कोरियामध्ये संसर्गाची तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली. दक्षिण कोरियाच्या माध्यमांनुसार, देशात दररोज 4,00,741 नवीन कोविड-19 रुग्म आढळले जे गेल्या वर्षातील जानेवारी नंतर सर्वाधिक आहे. यापैकी बहुतेक स्थानिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. म्हणजेच देशात कोरोनाचे स्थानिक संक्रमण सुरू झाले आहे.

Advertisement

ताज्या प्रकरणांसह, दक्षिण कोरियातील एकूण कोरोना रुग्णसंख्या (Covid Patient) 7,629,275 वर पोहोचली आहे, असे कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सी (KDCA) ने बुधवारी सांगितले. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियामध्ये मंगळवारी साथीच्या रोगाचा सर्वात धोकादायक दिवस होता, 24 तासांत 293 मृत्यू झाले. चीनलामध्येही कोरोना उद्रेकाने परिस्थिती गंभीर बनली आहे, ज्यामुळे लाखो लोकांना लॉकडाउनमध्ये रहावे लागत आहे.

Advertisement

एकूण संक्रमणामध्ये मोठी वाढ होऊन, चीनमध्ये (China) बुधवारी 3,290 नवीन COVID-19 प्रकरणे नोंदली गेली, ज्यात 11 गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. चीन, जेथे वुहानमध्ये (Wuhan) सर्वात आधी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, तेथे एका वर्षाहून अधिक काळ अधिकृतपणे कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी बातमी एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Loading...
Advertisement

कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याने शेन्झेनच्या दक्षिणेकडील प्रांतातील सुमारे 17.5 दशलक्ष रहिवाशांना लॉकडाऊनमध्ये (Lockdown) ठेवले आहे. याशिवाय शांघाय आणि इतर शहरांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियाचे युक्रेनवरील युद्ध, तेलाच्या वाढत्या किमतीआणि कमकुवत मागणी यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव असताना हे निर्बंध आले आहेत. कोविड-19 चे अतिसंसर्गजन्य ओमिक्रॉन प्रकार चीन आणि दक्षिण कोरियामधील प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे म्हटले जाते. हा प्रकार पुन्हा एकदा आजार रोखण्यासाठी चीनच्या ‘शून्य-कोविड’ धोरणासमोर सर्वात कठीण आव्हान सादर करत आहे.

Advertisement

‘येथे’ पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका..! कठोर लॉकडाऊन अन् दवाखानेही भरले; जाणून घ्या, काय आहे परिस्थिती..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply