Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : युक्रेनने ‘NATO’ ला पुन्हा दिलाय ‘त्या’ संकटाचा इशारा; नाटोलाही आहे ‘हा’ मोठा धोका..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही थांबलेले नाही. रशियाकडून हमले सुरुच आहेत. त्यामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान होत आहे. अमेरिका आणि युरोपिय देश युक्रेनला मदत करत आहेत, मात्र त्याने फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. परिस्थिती दिवसेंदिवस आधिक धोकादायक होत असल्याने आज अखेर युक्रेनने पुन्हा एकदा नाटोला गंभीर इशारा दिला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, की नाटोने वेळीच योग्य निर्णय घेतले नाहीत, तर रशिया आपल्या सदस्य देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात करेल.

Advertisement

झेलेन्स्की यांनी एका संदेशात या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी नाटोला युक्रेनच्या आकाशात नो-फ्लाय जोन घोषित करण्याची विनंती केली आहे. रशियाने युक्रेनच्या लष्करी तळाला लक्ष्य केल्याच्या एका दिवसानंतर झेलेन्स्की यांचे वक्तव्य आले आहे. झेलेन्स्की म्हणाले, की जर तुम्ही आमचे आकाश बंद केले नाही तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या जमिनीवर पडण्यास फार वेळ लागणार नाही.

Loading...
Advertisement

झेलेन्स्की यांनी त्यांच्या संदेशात असेही म्हटले आहे की, त्यांनी गेल्या वर्षीही नाटोला इशारा दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, की रशिया निर्बंधांशिवायही युद्ध सुरू करू शकतो आणि नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइनचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो. प्रादेशिक गव्हर्नर कोझित्स्की यांनी सांगितले की, रशियन विमानांनी येथे सुमारे 30 रॉकेट डागले. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने लिव्हजवळ हमला केला आहे, जे शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे जागतिक ठिकाण आहे. अनेक परदेशी संस्था येथे काम करतात. जखमींची माहिती अद्याप गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेची चांदी..! पहा, ‘त्याद्वारे’ कशी करतोय अब्जावधींची कमाई..

Advertisement
Advertisement

Leave a Reply