Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक..! दोन वर्षांनंतर प्रथमच सापडले ‘इतके’ नवे रुग्ण..

दिल्ली : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. काही देशात कोरोना आटोक्यात येत असला तरी असे बरेच देश आहेत जिथे कोरोनाने थैमान घातले आहे. दक्षिण कोरिया, हाँगकाँग नंतर चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत चालले आहेत. जवळपास 2 वर्षांनंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. रविवारी चीनमध्ये सुमारे 3400 नवीन रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत ही प्रकरणे दुप्पट आहेत. नवीन प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही देशासाठी चिंतेचे कारण बनली आहे. दोन वर्षांनंतर इतक्या मोठ्या संख्येने विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली आहे.

Advertisement

चीनमधील विविध शहरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. देशभरात हा विषाणू वेगाने पसरला असून, जिलिन शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, तर इतर शहरांमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे.

Advertisement

दरम्यान, जागतिक संकट ठरलेल्या कोरोना विषाणूने आता दक्षिण कोरियात थैमान घातले आहे. देशात कोविड-19 संसर्गाची नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत, त्यामुळे देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने शनिवारी सांगितले, की दक्षिण कोरियामध्ये तब्बल 3,83,665 कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यामुळे एकूण संक्रमणांची संख्या 6,206,277 झाली आहे. यासह, देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांचे हे नवीन रेकॉर्ड ठरले आहे.

Loading...
Advertisement

ओमिक्रॉन, कोविड-19 चे नवीन प्रकार देशभर पसरला आहे, ज्यामुळे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत. कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सी (KDCA) नुसार, शनिवारी असे नोंदले गेले की ओमिक्रॉन प्रकारामुळे नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आणि दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. विषाणूमुळे गंभीर प्रकरणांबद्दल सांगितले तर, या स्थितीत असणाऱ्या संक्रमित लोकांची संख्या 1,066 इतकी आहे, जी मागील दिवसाच्या तुलनेत 50 ने कमी झाली आहे.

Advertisement

बाब्बो.. आता ‘या’ देशात थैमान घालतोय कोरोना..! कोरोना रुग्णसंख्येने केले नवे रेकॉर्ड.. सापडलेत तब्बल ‘इतके’ रुग्ण

Advertisement
Advertisement

Leave a Reply