Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाचा युक्रेनवर खळबळजनक आरोप..! अमेरिकेच्या मदतीने सुरू आहे ‘हा’ धक्कादायक प्रकार..

दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. आता रशियाने युक्रेनवर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. रशियाने दावा केला आहे, की युक्रेन अमेरिकेच्या मदतीने रासायनिक आणि जैविक प्रयोगशाळा चालवत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या राजनयिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता होईल. संयुक्त राष्ट्रातील रशियाचे पहिले उपराजदूत दिमित्री पोलान्स्की यांनी गुरुवारी दुपारी बैठक घेण्याची विनंती केली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची शुक्रवारी एक बैठक होणार आहे, या बैठकीत रशियाने केलेल्या या दाव्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

युक्रेन अमेरिकेच्या मदतीने रासायनिक आणि जैविक प्रयोगशाळा चालवत असल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने हे दावे फेटाळून लावले आहेत. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी रशियाचे दावे निराधार असल्याचे सांगितले. रशिया युक्रेनविरुद्ध रासायनिक किंवा जैविक शस्त्रे वापरण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा त्यांनी बुधवारी दिला होता.

Advertisement

“रशियाने युक्रेनवर पूर्वनियोजित, विनाकारण आक्रमणाचे समर्थन करण्याचा हा डाव आहे,” असे साकी यांनी ट्विट केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील रशियाचे उपराजदूत दिमित्रा चमाकोव यांनी पुन्हा तोच आरोप करत पाश्चिमात्य माध्यमांनीही युक्रेनमध्ये असलेल्या गुप्त प्रयोगशाळांच्या बातम्या प्रसारित कराव्यात, असे आवाहन केले.

Loading...
Advertisement

दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने खार्किव शहरातील एका संस्थेवरही बॉम्ब टाकला. येथे अणुभट्टीचे काम सुरू होते. हे केंद्र पूर्णपणे मोडकळीस आले असून, अनेक प्रयोगशाळांचे नुकसान झाले आहे. रशियाने मुद्दाम प्रयोगशाळांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. तसेच सुमारे 280 शाळा आणि 63 रुग्णालये उद्ध्वस्त केली आहेत. आज या युद्धाचा 16 वा दिवस असून युद्ध अजूनही सुरुच आहे. हे घातक युद्ध थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.

Advertisement

आर्थिक निर्बंधांमुळे रशिया हैराण..! भारताला दिलीय ‘ही’ खास ऑफर; पहा, कसा होणार भारताचा फायदा..

Advertisement

रशियाला पाठिंबा देणारा चीन युक्रेनलाही देतोय मदत; पहा, चीनने काय दिलेय युक्रेनला..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply