Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेन वॉर्नला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ‘या’ दिवशी दिला जाणार अखेरचा निरोप

मुंबई – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी थायलंडमधील एका रिसॉर्टमध्ये निधन झाले. आता त्यांचा मृतदेह ऑस्ट्रेलियाला (Australia) पाठवण्यात आला आहे. थायलंड विमानतळानुसार, वॉर्नचा मृतदेह 10 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.54 वाजता रवाना करण्यात आला आहे. वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

वॉर्नचा थायलंडमधील कोह सामुई बेटावर शुक्रवारी मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह रविवारी सुरत ठाण्यात नेण्यात आला. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री सुरत ठाणे येथून राजधानी बँकॉक येथे पोहोचले. येथून त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले.

Advertisement

मेलबर्नमधील अंत्यसंस्काराला एक लाख लोक उपस्थित राहणार
मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) वॉर्नला अंतिम निरोप देण्यात येणार आहे. या निरोपाला एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनही उपस्थित राहणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजी त्याला शेवटचा निरोप देण्यात येणार आहे. वॉर्नच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो प्रथम खाजगीत अंतिम संस्कार करणार आहे.

Advertisement

वॉर्नचे मॅनेजर डॅनियल अँड्र्यूज यांनी बुधवारी ट्विट केले की वॉर्नीला निरोप देण्यासाठी MCG पेक्षा चांगली जागा जगात दुसरी नाही. येथेच त्याने 1994 च्या ऍशेसमध्ये हॅट्ट्रिक केली आणि 2006 मध्ये त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत 700 वी कसोटी विकेट घेतली. वॉर्नचा जन्म मेलबर्नमध्ये झाला आणि इथेच वाढला.

Loading...
Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

वॉर्न हा सर्वाधिक विकेट घेणारा लेग स्पिनर आहे

Advertisement

कसोटी क्रिकेटमध्ये 600 आणि 700 बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील पहिला गोलंदाज ठरला. 2005 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत त्याने 600 बळी पूर्ण केले. 2006 मध्ये वॉर्नने मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध 700 बळींचा टप्पाही पार केला होता. त्याचा विक्रम नंतर श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने मोडला. मुरलीने 800 विकेट घेतल्या. वॉर्न अजूनही सर्वाधिक विकेट घेणारा लेगस्पिनर आहे. भारताचा अनिल कुंबळे 619 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply