Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियानंतर आता चीनही ‘NATO’ वर भडकला..! पहा, युद्धाबाबत काय केलाय गंभीर आरोप..?

दिल्ली : युक्रेन विरोधात युद्ध सुरू करुन रशिया जगाच्या निशाण्यावर आला असला तरी आता नाटोच्या कारवाया सुद्धा समोर येत आहेत. काही देशांनी तर युद्ध आणखी भडकण्यास नाटोच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. रशियानेही नाटोच्या चाली ओळखत नाटोला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता चीननेही नाटोवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

Advertisement

याआधी रशियाने नाटोवर घणाघाती टीका केली होती. तसेच नाटोचा खरा प्लान काय आहे, हे सुद्धा उघड केले होते. नाटोचा खरा उद्देश आम्हाला रोखणे हा आहे, असे रशियाने म्हटले आहे. त्याचवेळी आम्ही नाटोला जोरदार प्रत्युत्तर देऊ, असा इशारा रशियन सरकारने दिला आहे. एका अहवालानुसार, रशियाने दावा केला आहे की, पूर्वेकडील भागात नाटो सैन्य जमा होत आहे. त्याचवेळी रशियाने नाटोच्या या हालचालीचे वर्णन चिथावणीखोर असल्याचे केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे युक्रेन यापुढे नाटो सदस्यत्वाची मागणी करणार नाही, असे सांगितल्यानंतर रशियाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

रशियाला भीती होती की जर नाटो सैन्य युक्रेनमध्ये आले तर मॉस्को तिथून फार दूर नाही. रशियाच्या मागण्यांबाबत झेलेन्स्की यांनी आपण वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. झेलेन्स्की म्हणाले होते, की युक्रेन फक्त सुरक्षा हमी मागत आहे. आम्ही संवादातून मार्ग काढण्यास तयार आहोत.

Advertisement

त्यानंतर आता चीननेही नाटोवर आरोप केला आहे. युक्रेन-रशिया युद्धाबाबत चीनने नाटोवर (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन) मोठे आरोप केले आहेत. चीनने म्हटले आहे, रशिया आणि युक्रेनमधील तणाव नाटोने युद्धाच्या परिस्थितीपर्यंत नेऊन ठेवला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजिआन यांनी अमेरिकेला चीनच्या चिंता गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आणि युक्रेनचा प्रश्न आणि रशियाबरोबरील संबंध सांभाळण्यात आपले अधिकार किंवा हितसंबंध कमी करणे टाळावे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply