बाब्बो.. संतापलेल्या रशियाने आता NATO ला धमकावले..! जशास तसे उत्तर देण्याचा दिलाय इशारा; पहा, नेमके काय घडले..?
दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरु आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांत अनेक बैठका घेण्यात आल्या, तरी देखील कोणत्याही देशाने माघार घेतलेली नाही. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध सुरू केले त्याला कारणेही तशीच आहेत. नाटोने आपल्या संघटनेचा विस्तार केला असून आधीच्या सोव्हिएत युनियनमधील काही देश नाटोमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर युक्रेनही त्याच वाटेवर होता. युक्रेन जर नाटोमध्ये सामील झाला असता तर रशिया चारही बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी घेरला गेला असता.
विशेष म्हणजे, या नाटो देशांवर अमेरिकेचे वर्चस्व राहिले असते. आणि हेच नेमके रशियाला नको होते, त्यासाठी रशियाने युक्रेन विरोधात उघड युद्ध पुकारले. आज 14 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. अमेरिकेसह काही नाटो देश युक्रेनला मदत करण्याची घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे रशियावर कठोर आर्थिक निर्बंध टाकत आहेत. त्यामुळे रशियाचेही नुकसान होत आहे.
तरी देखील रशियाने युद्ध थांबवलेले नाही. आता तर रशियाने नाटोवरच घणाघाती टीका केली आहे. तसेच नाटोचा खरा प्लान काय आहे, हे सुद्धा उघड केले आहे. नाटोचा खरा उद्देश आम्हाला रोखणे हा आहे, असे रशियाने म्हटले आहे. त्याचवेळी आम्ही नाटोला जोरदार प्रत्युत्तर देऊ, असा इशारा रशियन सरकारने दिला आहे.
एका अहवालानुसार, रशियाने दावा केला आहे की, पूर्वेकडील भागात नाटो सैन्य जमा होत आहे. त्याचवेळी रशियाने नाटोच्या या हालचालीचे वर्णन चिथावणीखोर असल्याचे केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे युक्रेन यापुढे नाटो सदस्यत्वाची मागणी करणार नाही, असे सांगितल्यानंतर रशियाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रशियाला भीती होती की जर नाटो सैन्य युक्रेनमध्ये आले तर मॉस्को तिथून फार दूर नाही. रशियाच्या मागण्यांबाबत झेलेन्स्की यांनी आपण वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे सांगितले. झेलेन्स्की म्हणाले, की युक्रेन फक्त सुरक्षा हमी मागत आहे. आम्ही संवादातून मार्ग काढण्यास तयार आहोत.
युक्रेन-रशिया युद्धात ‘या’ देशात आलेय नवेच संकट; सरकार जाहीर करणार आणीबाणी ? ; पहा, काय घडलेय..?
Russia-Ukraine War : युद्धाचा रशियालाही बसलाय जबर दणका; पहा, आतापर्यंत किती सहन केले नुकसान..