Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेन-रशिया युद्धात ‘या’ देशात आलेय नवेच संकट; सरकार जाहीर करणार आणीबाणी ? ; पहा, काय घडलेय..?

दिल्ली : जगासाठी सध्याचा काळ संकटाचाच आहे. कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच रशिया-युक्रेन युद्धाच्या रुपाने नवीन संकट समोर आले आहे. काही देशात तर निसर्गानेच विक्राळ रुप धारण केले असून त्याचा जोरदार फटका बसत आहे. ऑस्ट्रेलिया सध्या अशाच एका नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. हे संकट इतके वाढले आहे, की पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी थेट राष्ट्रीय आणीबाणी (national emergency) जाहीर करण्याचा विचार करत आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison)  म्हणाले की, देशाच्या ईशान्येकडील पूर राष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित करण्याची योजना आहे. मॉरिसन यांनी न्यू साउथ वेल्सच्या उत्तरेकडील राज्यातील भीषण पुरामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणांना भेट दिली, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. या घोषणेमुळे फेडरल सरकारला ऑस्ट्रेलियन संरक्षण दल तैनात करण्यात मदत होईल आणि बाधित भागात आर्थिक मदत मिळेल. बुधवारी नेत्यांबरोबर चर्चा करून मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या संकटात (Australia flood) किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो इमारतींचे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी 25 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर ($182 दशलक्ष) आपत्कालीन मदत, पीडितांसाठी अन्न मदत आणि समुपदेशन सेवा आणि दीर्घकालीन मानसिक आरोग्य सेवांसाठी 31.12 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर ($227 दशलक्ष) जाहीर केले आहेत. मॉरिसन म्हणाले, की आम्ही नवीन मानसिक आरोग्य समर्थनाची घोषणा करत आहोत. या संकटामधून आणखी लोकांना मदत करण्यासाठी काय आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी सरकार आवश्यक कार्यवाही करेल.

Loading...
Advertisement

दरम्यान, 50 वर्षांपूर्वीच्या तुलनेत पृथ्वी आता आपल्या अक्षावर वेगाने फिरत आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, पृथ्वीचा हा वेग असाच सुरू राहिला तर त्यांना अणु घड्याळातून एक सेकंद कमी करावा लागेल. पृथ्वीच्या अक्षावर फिरण्याचा वेग दर काही दशकांनी बदलतो. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वी वर्षातून 420 वेळा फिरत होती, पण आता ती 365 वेळा फिरते. पृथ्वीच्या या परिभ्रमणामुळे दिवस आणि रात्र होते. जेव्हा जेव्हा पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमध्ये थोडासा बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम अणु घड्याळावर होतो, ज्याला ग्लोबल टाइमकीपर म्हणतात.

Advertisement

बाब्बो.. पृथ्वीवर ‘हे’ कोणतं संकट घोंगावतयं..? ; ‘तसे’ घडले तर होईल एक सेकंद कमी; पहा, काय म्हटलेय तज्ज्ञांनी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply