Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : युद्धाचा रशियालाही बसलाय जबर दणका; पहा, आतापर्यंत किती सहन केले नुकसान..

दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Russia-Ukraine War) आतापर्यंत दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या लष्कराने दावा केला आहे की 24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाल्यापासून 7 मार्चपर्यंत 12 हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय शत्रूची अनेक शस्त्रे आणि लष्करी वाहनेही नष्ट करण्यात आली आहेत. रशियानेही युक्रेनचे हजारो सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

Advertisement

24 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात झालेल्या युद्धात 12,000 रशियन सैनिक मारले गेल्याचे युक्रेनच्या लष्कराने सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने रशियन सैनिक मारले गेले असतील तर अफगाणिस्तान युद्धात सोव्हिएत युनियनने मारले गेलेल्या सैनिकांची संख्या पार केली आहे. अफगाणिस्तानमध्ये 80 च्या दशकात सुरू झालेल्या युद्धात 10,000 सैनिक मारले गेले होते.

Advertisement

आतापर्यंत रशियन सैन्याचे 303 रणगाडे नष्ट झाले आहेत. याशिवाय 1036 आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्स, 120 आर्टिलरी सिस्टिम, 56 MLRS आणि 27 एअर डिफेन्स सिस्टिम्सही नष्ट करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, 48 रशियन विमाने, 80 हेलिकॉप्टर, 474 स्वयंचलित तंत्रज्ञान आणि 3 जहाजे नष्ट केली आहेत. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मते, मंगळवारी युक्रेन (Ukraine) सोडणाऱ्या निर्वासितांची संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे, जे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठे स्थलांतर आहे.

Loading...
Advertisement

रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारले आहे. आज 13 दिवसांनंतरही युद्ध थांबलेले नाही. या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. तर दुसरीकडे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक देशांनी रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या निर्बंधांचा फटका रशियाला बसत आहे. रशियावर रोजच नवीन निर्बंध टाकले जात असल्याने आजमितीस रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश ठरला आहे. या निर्बंधांमुळेच रशियात आणखी एक संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : आता युक्रेनलाही नकोय ‘NATO’ चे सदस्यत्व; रशियाला दिलीय ‘ही’ मोठी ऑफर..

Advertisement

Russia-Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष संतापले..! रशियाबाबत ब्रिटेनकडे केलीय ‘ही’ मोठी मागणी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply