Russia-Ukraine War : पाश्चिमात्य देशांनी केला युक्रेनचा विश्वासघात.. संतापलेल्या युक्रेनने केला ‘हा’ गंभीर आरोप..
दिल्ली : युक्रेनला पाठिंबा देण्याची भाषा करणाऱ्या पाश्चिमात्य आणि युरोपियन देशांनी ऐन युद्धात युक्रेनला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले. या देशांनी युक्रेनला कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे 13 दिवसांच्या युद्धात रशियाने युक्रेनमधील अनेक शहरेच्या शहरे बेचिराख करुन टाकली. आज या युद्धात युक्रेन एकटा पडला आहे. कोणत्याही मदतीशिवाय रशियाला टक्कर देत आहे. नाही म्हणायला अमेरिका आणि युरोपिय देशांनी लष्करी साहित्य खरेदी करण्यासाठी युक्रेनला आर्थिक मदत दिली आहे. अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांच्या या कारभारावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा अत्यंत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
युक्रेनियन मीडिया आउटलेट द कीव इंडिपेंडंटने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, की अध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाव न घेता, युक्रेनियन शहरे आणि नागरिकांचे रशियन हमल्यांपासून संरक्षण न केल्याबद्दल पाश्चात्य राष्ट्रांना दोष दिला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, रशियन हमले रोखण्यासाठी युक्रेनवर “नो फ्लाय जोन” आदेश देण्यासह, गेल्या 13 दिवसांत पाश्चात्य राष्ट्रे “स्पष्टपणे आवश्यक” निर्णय घेण्यात अपयशी ठरली आहेत. तसे न केल्यामुळे ते आमच्या देशाचे संरक्षण करण्यातही अपयशी ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले, की रशियन दोषी आहेतच शिवाय त्या लोकांनाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही ज्यांनी गेल्या 13 दिवसांत कोणताच आवश्यक निर्णय मंजूर केला नाही. त्यांनी आमच्या शहरांचे संरक्षण केले नाही, ज्यांना ते करता आले असते. आज 13 दिवस झाले आहेत. आम्ही फक्त आश्वासने ऐकत आहोत, 13 दिवसांत आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्हाला मदत केली जाईल, विमाने असतील जी ती आमच्यापर्यंत पोहोचतील. पण त्यांची सुद्धा जबाबदारी आहे ज्यांनी 13 दिवसांपासून कोणताच निर्णय घेतलेला नाही.
युद्ध रशिया-युक्रेनचे पण, भारतीयांना बसणार ‘असा’ फटका; पहा, कोणत्या वस्तू होणार जास्त खर्चिक..?