Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून NATO ने रशिया विरोधात ‘तो’ निर्णय घेतलाच नाही; पहा, काय आहेत युक्रेनला नकार देण्याची कारणे..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये अतोनात नुकसान केले आहे. युक्रेनच्या आकाशात फक्त रशियन लढाऊ विमाने दिसतात. ही लढाऊ विमाने युक्रेनमधील शहरांवर आणि लष्करी तळांवर सतत बॉम्बफेक करत आहेत. रशियाच्या आक्रमणाने हैराण झालेले राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे युक्रेनवर नो-फ्लाय जोन घोषित करण्याची अमेरिका आणि नाटोकडे सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, नाटोने युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे युक्रेनच्या अडचणी वाढल्या आहेत. युक्रेनची ही मागणी मान्य न करण्यामागेही काही कारणे आहेत. त्यामुळे नाटो आणि अमेरिका हा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नाहीत.

Advertisement

ज्यावर विमानांना उड्डाण करण्यास मनाई आहे, त्या परिसराला नो फ्लाय जोन म्हटले जाते. अनेकदा सुरक्षेच्या कारणासाठी केले जाते. फ्लाय जोन नसलेल्या भागात कोणत्याही प्रकारचे विमान उड्डाण करू शकत नाही. फ्लाय जोन नसलेल्या भागातून विमानाने उड्डाण केले तर ते खाली पाडले जाते किंवा त्या विमानास खाली येण्यास सांगितले जाते. अमेरिका, ब्रिटेन आणि नाटो देशांनी युक्रेनला नो-फ्लाय जोन घोषित करावे, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली आहे. असे घडल्यास रशियन लढाऊ विमाने युक्रेनवरून उडू शकत नाहीत आणि जर त्यांनी उड्डाण केले तर ते पाडले जातील.

Advertisement

हवाई क्षेत्र बंद करणे आणि नो-फ्लाय जोन घोषित करणे यात मोठा फरक आहे. हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे केवळ व्यावसायिक विमाने उड्डाण करू शकत नाहीत, परंतु नो-फ्लाय जोनमध्ये कोणतेही विमान उड्डाण करू शकत नाही. जर अमेरिका, ब्रिटेन किंवा नाटो देशांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आवाहनानुसार युक्रेनला नो-फ्लाय जोन घोषित केले तर त्यांना त्यांची विमाने युक्रेनला पाठवावी लागतील.

Loading...
Advertisement

झेलेन्स्कीची मागणी फेटाळून लावताना नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले की, जर आपण असे केले तर संपूर्ण युरोपमध्ये युद्धाचा धोका वाढू शकतो. जर युक्रेनमध्ये नो-फ्लाय जोन घोषित केला, तर आपल्याला रशियन विमाने पाडण्यासाठी आपली विमाने तेथे पाठवावी लागतील, ज्यामुळे संपूर्ण युरोपवर युद्धाचा धोका वाढेल. आम्हाला कोणताही संघर्ष नको असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

Advertisement

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला आहे की, जर तिसऱ्या देशाने युक्रेनला नो-फ्लाय जोन घोषित केले तर ते रशियाविरुद्ध लष्करी संघर्ष मानले जाईल. या महत्वाच्या कारणांमुळे युक्रेनला नो फ्लाय जोन घोषित करणे अमेरिका आणि नाटो देशांना शक्य झालेले नाही.

Advertisement

बाब्बो.. रशियाने तयार केलीय शत्रू देशांची यादी; पहा, कुणी केलाय ‘हा’ खळबळजनक दावा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply