Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशियावरील निर्बंधांचा चीनने घेतलाय धसका.. पहा, आता कोणता निर्णय घेतलाय..?

दिल्ली : रशिया विरुद्धच्या निर्बंधांवर पश्चिमेकडून टीका होत असतानाही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मॉस्कोला मदत करण्याची भूमिका घेतली नाही. चीनच्या नेतृत्वाखालील विकास बँक एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) ने 3 मार्च रोजी रशिया आणि बेलारूस बरोबर सर्व व्यवहार निलंबित केले, असे वृत्त रेडिओ फ्री युरोपने दिले आहे. त्याचप्रमाणे शांघायस्थित न्यू डेव्हलपमेंट बँकेनेही त्याच दिवशी रशियाबरोबरील व्यवहार निलंबित केले आहे.

Advertisement

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे अनेक कंपन्यांनी रशिया आणि बेलारूसमधील त्यांचे ऑपरेशन रद्द केले. क्रेडिट कार्ड आणि पेमेंट दिग्गज मास्टरकार्ड आणि व्हिसा यांनी रशियामध्ये सर्व व्यवहारांवर बंदी घातली असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर या नव्या घडामोडी घडल्या आहेत. तथापि, अलिकडच्या वर्षांत रशिया आणि चीनमधील आर्थिक संबंध दृढ झाले आहेत. चीनला रशियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनवण्यासाठी द्विपक्षीय व्यापारात वाढ केली आहे. दोन्ही देशांनी चीनी युआनमध्ये अधिक सौद्यांची मागणी केली आहे, जी यूएस-डॉलर आर्थिक प्रणालीच्या बाहेर आहे.

Advertisement

चीनने युक्रेनवरील पुतिनच्या कारवाईला आक्रमण म्हणण्यास नकार दिला आहे आणि पाश्चात्य-नेतृत्वाच्या निर्बंधांचा निषेध केला आहे तरीही चीनच्या सरकारी मालकीच्या वित्तीय संस्था शांतपणे रशियाच्या अर्थव्यवस्थेपासून दूर आहेत. हे पाऊल बीजिंगच्या बाजूने काळजीपूर्वक संतुलित हालचाली दर्शवते, कारण ते निर्बंधांचे उघडपणे दुर्लक्ष न करता रशियाबरोबर संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. खरेच, चीनला भीती वाटते की प्रमुख पाश्चात्य निर्यात बाजारपेठेतील चीनचा प्रवेश आणि अमेरिकन डॉलर-केंद्रित आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली धोक्यात येऊ शकते.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेनवर रशियाच्या युद्धा दरम्यान चीनने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की चीन आणि रशिया या दोन्ही देशांतील मैत्री अत्यंत भक्कम आहे. मात्र, युक्रेन-रशिया संकट संपवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने गेल्या महिन्यात आपला जवळचा मित्र रशियाचा निषेध करण्यास नकार दिला आहे.

Advertisement

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, की “दोन्ही देशांमध्ये घट्ट मैत्री आहे आणि दोन्ही बाजूंच्या भविष्यातील सहकार्याच्या शक्यता प्रचंड आहेत.” गरज पडल्यास दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी चीन आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

‘त्यामुळे’ चीन पुन्हा घाबरला..! दोन वर्षांनंतर प्रथमच घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार; जाणून घ्या..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply