Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ चीन पुन्हा घाबरला..! दोन वर्षांनंतर प्रथमच घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार; जाणून घ्या..

दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर पहिल्यांदात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याने चीन सरकारही घाबरले आहे. गेल्या 24 तासांत येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या आकडेवारीनुसार, रविवारी चीनमध्ये कोरोनाचे 214 संक्रमित रुग्ण आढळले. चीनमध्ये स्थानिक पातळीवर आढळून आलेले संक्रमण आणि बाहेरून येणाऱ्या लोकांचीही माहिती घेण्यात येत आहे. या कार्यवाहीस मार्च 2020 पासून सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारे, एका दिवसात देशांतर्गत आढळून आलेली ही सर्वात मोठी संक्रमित संख्या आहे.

Advertisement

चीनमध्ये अलीकडेच आढळलेली स्थानिक प्रकरणे जागतिक मानकांपेक्षा खूप कमी आहेत. चीन सरकार सध्या ‘डायनॅमिक-क्लीअरिंग’ धोरणावर काम करत आहे. या अंतर्गत, स्थानिक अधिकाऱ्यांना प्रत्येक संसर्ग आणि त्यांच्या जवळच्या संपर्कांची त्वरित ओळख करण्याचे काम देण्यात आले आहे. याबरोबरच अशा लोकांच्या प्रवासावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

रविवारच्या 214 स्थानिक प्रकरणांपैकी बहुतेक ग्वांगदोंग, जिलिन आणि शेडोंग प्रांतात आढळून आले. स्थानिक प्रसारित लक्षणे नसलेल्या 312 प्रकरणांची शेवटच्या दिवशी नोंद झाली. हा आकडा मार्च 2020 नंतरचा सर्वात मोठा आहे. मात्र, 24 तासांत एकाही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही, त्यामुळे मृतांची संख्या 4636 झाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 1,11,195 कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यात स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

कोविड-19 चे ओमिक्रॉन प्रकार चीनच्या अनेक शहरांमध्ये वेगाने पसरत आहे. त्याच वेळी, रविवारी हाँगकाँगमध्ये 31,008 कोविड प्रकरणे आणि 153 मृत्यूची नोंद झाली. एका दिवसाआधी येथे सुमारे 40 हजार प्रकरणे आढळून आली होती, तर तीन दिवसांपूर्वी सुमारे 50 हजार रुग्ण आढळले होते.

Advertisement

अर्र.. आता कशी करणार कोरोनाची चौकशी..? ; पहा, चीनने काय केलाय नवा कारनामा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply