Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. रशियावरील निर्बंधांचे होणार दुष्परिणाम..! ‘त्या’ देशांचे होणार मोठे नुकसान; कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढणार..

दिल्ली : युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भारतासह अन्य देश जे मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतात, त्यांचे टेन्शन वाढले आहे. इन्व्हेस्टमेंट बँकर मॉर्गन स्टॅन्ले म्हणतात, की जर रशियाकडून तेलाचा पुरवठा विस्कळीत होत राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 185 डॉलरच्या पातळीवर पोहोचेल. गुरुवारी कच्च्या तेल $120 च्या पातळीवर पोहोचले होते आणि आज ते $110 च्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे.

Advertisement

खरे तर, अमेरिका आणि युरोपमधील इतर देश रशियावर निर्बंध लादत आहेत. त्यामुळे त्यांना तेलाची मुक्तपणे निर्यातही करता येत नाही. जेपी मॉर्गनच्या मते, रशिया सध्या 66 टक्के तेल निर्यात करू शकत नाही.

Advertisement

या अहवालात असे म्हटले आहे की, अल्पावधीत तेल पुरवठ्याची समस्या इतकी वाढेल की कच्चे तेल प्रति बॅरल $120 च्या पातळीवर राहील. रशियावर सर्व प्रकारचे निर्बंध टाकल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर वाईट परिणाम होईल. विशेषतः युरोपातील देशांना त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील. रशियाची युरोप आणि अमेरिकेला होणारी तेल निर्यात सध्या दररोज 4.3 दशलक्ष बॅरलने कमी होईल.

Advertisement

दुसऱ्या तिमाहीत कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $110, तिसऱ्या तिमाहीत $100 प्रति बॅरल आणि चौथ्या तिमाहीत $90 राहील असा विश्वास जेपी मॉर्गन यांनी व्यक्त केला आहे. इराणकडून तेल पुरवठा सुरू न केल्यास, दुसऱ्या तिमाहीत सरासरी किंमत $115, तिसऱ्या तिमाहीत $105 आणि चौथ्या तिमाहीत $95 प्रति बॅरल असेल.

Advertisement

रशिया हा जगातील सर्वात मोठा कच्चे तेल उत्पादक देश आहे. देशात दररोज 11 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होते. यातील 5-6 दशलक्ष बॅरल तेल निर्यात केले जाते. रशिया सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. रशियाची निम्मी तेल निर्यात जर्मनी, इटली, लिथुआनिया, ग्रीस, रोमानिया आणि बल्गेरिया या युरोपीय देशांना होते. दुसरीकडे, ओपेक देशांनीही तेल उत्पादनात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेन-रशियामधील वाढत्या तणावामुळे येत्या काही दिवसांत ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $180 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Advertisement

Russia-Ukraine War : आता ब्रिटेनवर भडकलाय रशिया; परराष्ट्र मंत्र्यांनी थेट धमकीच दिली..

Advertisement
Advertisement

Leave a Reply