Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : आता ब्रिटेनवर भडकलाय रशिया; परराष्ट्र मंत्र्यांनी थेट धमकीच दिली..

दिल्ली : रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ब्रिटनवर निशाणा साधताना ब्रिटनने मुद्दाम युद्धात उतरल्याचे म्हटले आहे. तसेच ब्रिटनला या निर्बंधांची मोठी किंमत द्यावी लागेल असेही ते म्हणाले. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की ब्रिटनने स्पष्टपणे रशियाशी उघड संघर्षाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटेनला रशियाशी थेट युद्ध करायचे आहे, असे रशियाने म्हटले आहे. याआधी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी सांगितले की, जो कोणताही देश युक्रेनमध्ये नो-फ्लाय जोन करेल, आम्ही त्या देशास युद्धात सहभागी देश म्हणून मानू.

Advertisement

रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, की या दिशेने कोणत्याही घडामोडी सशस्त्र संघर्षात सहभाग म्हणून मानल्या जातील. नो-फ्लाय जोन केल्याने केवळ युरोप नव्हे तर संपूर्ण जगासाठी मोठे आणि विनाशकारी परिणाम होतील. रशिया आणि युक्रेनमध्ये गेले आठवडाभर युद्ध सुरू आहे.

Advertisement

व्लादिमीर पुतिन यांनीही रशिया मार्शल लॉ जाहीर करण्याचा विचार करत असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या. खरे तर रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यानंतर मॉस्कोमध्ये जबरदस्त निदर्शने झाली. तेव्हापासून या प्रकरणाची चर्चा सुरू होती. ज्या ठिकाणी जास्त निदर्शने होतील त्या ठिकाणीच मार्शल लॉ लागू केला जाईल, असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले. आम्हाला आतापर्यंत अशी परिस्थिती पाहायला मिळाली नाही आणि मला आशा आहे की आम्हाला तशी परिस्थिती देखील पाहायला मिळणार नाही. रशियामध्ये पहिल्यांदाच लोक लष्करी कारवाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. सहसा अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात.

Loading...
Advertisement

दुसरीकडे, युक्रेन आणि रशिया दरम्यान जाहीर करण्यात आलेला युद्धविराम काही तासांतच मोडला आहे. खरे तर, युक्रेनच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, की युद्धविराम घोषित झाल्यानंतर काही तासांनी गोळीबार सुरू झाला. त्यामुळे मारियुपोल आणि वोल्नोवाखा शहरांमधून लोकांना बाहेर काढण्याच्या कार्यवाहीत व्यत्यय आला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या दोन शहरातील लोकांना बाहेर काढण्यासाठी मार्ग देण्याचे मान्य केले आहे. मात्र, ते मार्ग किती दिवस सुरू राहतील, हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाचा पाकिस्तानला जबर झटका..! भडकलेल्या ब्रिटेनने थेट कारवाईच केली; पहा, काय आहे प्रकार..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply