Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : चीनलाही ‘त्याची’ खात्री नाही; पहा, जीडीपी टार्गेट किती कमी केले..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील दहा दिवसांच्या भीषण युद्धाचा परिणाम जगातील इतर देशांवरही दिसून येत आहे. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतासह अनेक देशांमध्ये महागाईचा धोका निर्माण झाला आहे, तर चीनच्या अर्थव्यवस्थेलाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. यामुळेच चीनने या वर्षातील जीडीपीचे (Gross Domestic Product) लक्ष्य 5.5 टक्क्यांवर आणले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, चीनने या वर्षासाठी आपले सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) लक्ष्य गेल्या वर्षीच्या 6.1 वरून 5.5 टक्के केले आहे. ही 1991 नंतरची सर्वात कमी संख्या आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी शनिवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये सादर केलेल्या कार्य अहवालात नवीन GDP लक्ष्य जाहीर केले. विशेष म्हणजे, चीनची अर्थव्यवस्था 2021 मध्ये 8.1 टक्के दराने वाढून सुमारे $18 ट्रिलियन झाली. विकासाचा वेग 2021 मध्ये सरकारच्या सहा टक्क्यांहून अधिक लक्ष्यापेक्षा जास्त होता.

Advertisement

जीडीपीचे लक्ष्य कमी करण्यामागील कारणाचा उल्लेख करताना पंतप्रधान केकियांग म्हणाले की, कोरोना संकट, मालमत्ता क्षेत्रातील मंदी आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे चीनच्या जीडीपीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे उद्दिष्ट 5.5 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र झाले आहे. दहा दिवसांत त्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे, तर युक्रेनमधील शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.

Loading...
Advertisement

एकीकडे चीनने आपले जीडीपी लक्ष्य कमी केले असताना दुसरीकडे संरक्षण बजेट 7.1 टक्क्यांनी वाढ करुन $230 अब्ज करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव गेल्या वर्षाच्या तुलनेत 21 अब्ज डॉलर अधिक आहे. गेल्या वर्षी संरक्षण बजेट $209 अब्ज होते. चीनचे संरक्षण बजेट भारताच्या तुलनेत तिप्पट आहे.

Advertisement

युद्धाच्या संकटात चीनला वाटतेय ‘त्याची’ भीती.. पहा, संरक्षणासाठी काय केलीय मोठी घोषणा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply