Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : .. म्हणून रशियाने ‘या’ दोन शहरात थांबवले युद्ध; रशियाने जाहीर केला युद्धविराम; पहा, काय आहे कारण..?

दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधातील युद्धातील आजच्या दहाव्या दिवशी तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करुन देणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. आज (5 मार्च) सकाळी 10 वाजता रशियन बाजूने युद्धविराम जाहीर केला आहे. मारियुपोल आणि वोल्नोवाखा येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे स्पुतनिक वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे.

Advertisement

रशियन राज्य वृत्त संस्थांनी अहवाल दिला आहे, की रशियन सैन्य युक्रेनच्या दोन प्रदेशांमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शनिवारपासून युद्धविराम पाळणार आहे. स्पुतनिकने देखील ट्विट केले, की “रशियाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता युक्रेनमधील नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यासाठी युद्धविराम जाहीर केला.”

Advertisement

दरम्यान, रशियाचे हमले सातत्याने वाढत असताना या संकटकाळात युक्रेनची मदत करण्याऐवजी नाटोने या देशाला जोरदार झटका दिला आहे. युक्रेनला नो-फ्लाय जोन घोषित करण्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन नाटोने फेटाळले आहे. ही मागणी फेटाळल्यानंतर शनिवारी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोला फटकारले. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनमधील मृत्यू आणि विनाशाला पश्चिमेकडील लष्करी आघाडी जबाबदार असेल. नाटोची कमजोरी आणि एकजुटीचा अभाव यामुळे रशिया आधिक आक्रमक होईल आणि हमले आणखी तीव्र करेल.

Loading...
Advertisement

शुक्रवारी नाटोने युक्रेनला रशियन क्षेपणास्त्रे आणि युद्ध विमानांपासून संरक्षण करण्यास मदत करण्याची युक्रेनची विनंती नाकारली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नाटोची बाजू घेतली आणि युक्रेनवर नो-फ्लाय जोनचे आवाहन नाकारले. अँटनी ब्लिंकन म्हणाले की, नो-फ्लाय जोन म्हणजे रशियन विमाने पाडण्यासाठी नाटोची विमाने युक्रेनच्या हवाई क्षेत्रात पाठवणे. यामुळे युरोपमध्ये सर्वत्र युद्ध होऊ शकते.

Advertisement

Russia-Ukraine War : अमेरिका-नाटोच्या कारनाम्यांमुळे भडकला रशिया; ‘त्या’ मुद्द्यावर चीनने दिलेय प्रत्युत्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply