Russia-Ukraine War : अमेरिका-नाटोच्या कारनाम्यांमुळे भडकला रशिया; ‘त्या’ मुद्द्यावर चीनने दिलेय प्रत्युत्तर
दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात चीन सध्या अमेरिकेवर चांगलाच भडकला आहे. कारण, अमेरिकेने अशा काही कारवाया केल्या आहेत, ज्यामुळे हुकुमशाही प्रवृत्तीचा चीन अस्वस्थ आहे. या युद्धाच्या काळात अमेरिकेने चीनचा धोका असल्याचे कारण देत तैवान प्रकरणात हस्तक्षेप सुरू केला आहे. तसेच चीनवर गंभीर आरोप करण्याचे प्रकार सुरू ठेवले आहेत. त्यामुळे चीननेही अमेरिकेच्या चाली लक्षात घेऊन अमेरिकेस जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. फक्त अमेरिकाच नाही तर आता चीनने नाटोला (NATO) सुद्धा टार्गेट केले आहे.
चीनने रशियाला 2022 हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा संपेपर्यंत युक्रेनवर आक्रमण करू नये, असे सांगितले होते असे अमेरिकन वृत्तपत्राने वृत्त दिले होते. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले, की अमेरिकन वृत्तपत्रातील आरोप “पूर्णपणे खोट्या बातम्या आहेत आणि लक्ष विचलित करण्याच्या अशा पद्धती घृणास्पद आहेत.” युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देण्यास नकार न देत अमेरिकेने रशियाला चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.
न्यूयॉर्क टाईम्सने पाश्चात्य गुप्तचरांचा हवाला देत वृत्त दिले होते की, चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांना बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा संपेपर्यंत युक्रेनवर आक्रमण करू नये असे सांगितले होते. लेखात दावा करण्यात आला होता, की अहवालावरून असे दिसते, की वरिष्ठ चीनी अधिकार्यांना आक्रमण सुरू होण्याआधी रशियाच्या युद्ध योजना किंवा हेतूंबद्दल काही प्रमाणात प्रत्यक्ष माहिती होती.
चीन 35 देशांपैकी एक होता ज्याने बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेचे मतदान टाळले ज्यामध्ये 141 देशांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध केला, तर रशियासह केवळ 5 सदस्यांनी ठराव नाकारला. चीनच्या निर्णयाचे वर्णन करताना वांग यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्वसाधारण सभेच्या आणीबाणीच्या विशेष अधिवेशनात मतदानासाठी सादर केलेल्या मसुद्याच्या ठरावात पूर्ण सदस्यत्वाबाबत पूर्ण चर्चा करण्यात आलेली नव्हती. तसेच हा प्रस्ताव इतिहास आणि सध्याच्या संकटाची जोखीमही लक्षात घेत नव्हता.
दरम्यान, तैवानच्या अमेरिके बरोबरच्या वाढत्या सहकार्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीन तैवानवर आपला अधिकार सांगत आहे, जरी तैवानचे लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. अलिकडच्या काही महिन्यांत चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात शेकडो लढाऊ विमाने पाठवली आहेत. तसेच चीन तैवान विरोधात आपली लष्करी तयारी तीव्र करत आहे.
अमेरिकी अधिकाऱ्यांच्या तैवान दौऱ्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले होते की, चीनचे लोक राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. तैवानला पाठिंबा दर्शविण्याचा अमेरिकेचा कोणताही प्रयत्न व्यर्थ ठरेल. चीनने अमेरिकेला एक चीन तत्त्वाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिका चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत..! पहा, चीनच्या विरोधात कोणता नवा प्रस्ताव आलाय..?