दिल्ली : रशियाचे हमले सातत्याने वाढत असताना या संकटकाळात युक्रेनची मदत करण्याऐवजी नाटोने या देशाला जोरदार झटका दिला आहे. युक्रेनला नो-फ्लाय जोन घोषित करण्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन नाटोने फेटाळले आहे. ही मागणी फेटाळल्यानंतर शनिवारी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोला फटकारले. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनमधील मृत्यू आणि विनाशाला पश्चिमेकडील लष्करी आघाडी जबाबदार असेल. नाटोची कमजोरी आणि एकजुटीचा अभाव यामुळे रशिया आधिक आक्रमक होईल आणि हमले आणखी तीव्र करेल.
शुक्रवारी नाटोने युक्रेनला रशियन क्षेपणास्त्रे आणि युद्ध विमानांपासून संरक्षण करण्यास मदत करण्याची युक्रेनची विनंती नाकारली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नाटोची बाजू घेतली आणि युक्रेनवर नो-फ्लाय जोनचे आवाहन नाकारले. अँटनी ब्लिंकन म्हणाले की, नो-फ्लाय जोन म्हणजे रशियन विमाने पाडण्यासाठी नाटोची विमाने युक्रेनच्या हवाई क्षेत्रात पाठवणे. यामुळे युरोपमध्ये सर्वत्र युद्ध होऊ शकते.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. “आज आघाडीच्या नेतृत्वाने युक्रेनमधील शहरे आणि गावांवर आणखी बॉम्बफेक करण्यास परवानगी दिली आहे. नो-फ्लाय जोन तयार करण्यास नकार दिला आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी नाटोच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत युक्रेनच्या ‘फ्लाइट रिस्ट्रिक्टेड एरिया’ चा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
या दरम्यान, नाटोची विमाने आणि सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश करू नये यावर नेत्यांचे एकमत झाले. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. नाटो सैन्याला युक्रेनमध्ये प्रवेश करू देऊ नये किंवा युक्रेनच्या हवाई क्षेत्रात नाटोची उड्डाणे करू नये. आम्ही युक्रेनियन जमीन किंवा त्याच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करणार नाही.
तर जगावर येईल ‘ते’ भयंकर संकट..! पहा रशिया-युक्रेन युद्धामुळे नेमका काय घोटाळा झालाय ते