Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेन वॉर्नची कमाल, केलीय 1000 जणींसोबत धमाल..! पहा काय म्हटले होते त्यावर शेनने

दिल्ली : ऑस्ट्रेलिया देशातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अनेक क्रिकेट रसिकांचा चाहता असलेला शेन वॉर्न याचे 52 व्या वर्षी (Shane Warne Death) निधन झाले आहे. अनेकांनी या खेळाडूच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र, त्याचवेळी त्याचा खेळ आणि अफलातून किस्सेही आता बातम्या आणि सोशल मीडियामध्ये चर्चेत आहेत. त्यातील शेनचे सुमारे 1000 महिलांसोबत संबंध असल्याच्या एका पुस्तकातील दाव्यावर अनेकांनी गुगल सर्च सुरू केले आहे.

Loading...
Advertisement

महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वैयक्तिक आयुष्य वादांनी भरलेले होते. त्याच्या खेळाच्या मैदानावरील किस्सेपेक्षाही तो वादांमुळे चर्चेत आला आहे. विशेषत: महिलांबद्दलच्या त्याच्या आवडीच्या कथा माध्यमांमध्ये खूप गाजल्या होत्या. ब्रिटीश-ऑस्ट्रेलियन पत्रकार पॉल बॅरी (Paul Barry Book Spun Out) यांनी या महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या मूड आणि मस्त आयुष्यावर एक संपूर्ण पुस्तक लिहिले होते. एवढेच नाही तर वॉर्नचे 1000 महिलांसोबत संबंध असल्याचा दावाही त्याने केला आहे. बॅरीने 2006 मध्ये आपल्या ‘स्पून आऊट’ या पुस्तकात लिहिले होते की, ‘शेन वॉर्नने 1000 महिलांसोबत सेक्स केला आहे. मात्र, तो केवळ 5 वेळाच पकडला गेला. मात्र, वॉर्नने हे खरे मानले नाही. याबाबत शेन वॉर्नने ‘टेलिग्राफ’ला सांगितले की, ‘हा धक्कादायक रेकॉर्ड सर्वसमावेशक नाही. पॉलच्या पुस्तकाबद्दल मी एवढेच म्हणेन की त्यात 1000 स्त्रियांच्या गोष्टींसह अनेक चुका आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply