Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसणार जबर झटका.. जगातील दिग्गज कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे वाहन उद्योगाला मोठा फटका बसत आहे. मात्र, दोन्ही देशांमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. या युद्धास जबाबदार म्हणून वाहन कंपन्यांनी रशियाला चांगलाच झटका दिला आहे. जगातील अनेक दिग्गज वाहन कंपन्यांनी रशियातील प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांच्या या निर्णयामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसणार आहे. तसेच देशात रोजगाराचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येवर रशियन सरकार काय तोडगा काढणार हे अद्याप स्पष्ट नाही.

Advertisement

टोयोटा (Toyota) 4 मार्चपासून म्हणजेच आजपासून रशियातील आपला उत्पादन प्रकल्प बंद करत आहे, तर कंपनीने रशियामधून निर्यातीवरही बंदी घातली आहे. कंपनीचा सेंट पीटर्सबर्ग येथे एक प्लांट आहे, जो केवळ रशियन बाजारासाठी RAV4 आणि Camry मॉडेल तयार करतो. स्वीडिश ट्रक निर्माता एबी व्होल्वोने रशियामधील आपले सर्व प्लांट बंद केले आहेत, कंपनीने पुढील सूचना येईपर्यंत उत्पादन निलंबित केले जाईल असे म्हटले आहे. फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्टने (Renault) रशियातील कार असेंब्ली प्लांटमध्ये लॉजिस्टिकच्या अडचणींमुळे काही ऑपरेशन्स आधीच थांबवली आहेत.

Advertisement

दक्षिण कोरियाचा ह्युंदाई (Hyundai) कंपनी सेंट पीटर्सबर्ग येथील प्रकल्पात दरवर्षी सुमारे 2,30,000 कार तयार करते. जो रशियाच्या वाहन उत्पादनाच्या 27.2 टक्के आहे. ह्युंदाईने रशियातील उत्पादनही बंद केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार, कंपनीने सांगितले की पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे या आठवड्यात सेंट पीटर्सबर्गमधील कार निर्मिती प्रकल्प स्थगित करेल, परंतु पुढील आठवड्यात पुन्हा ऑपरेशन सुरू करेल.

Loading...
Advertisement

स्कोडा ऑटो (Skoda Auto) कंपनीने सांगितले, की पुरवठ्यातील अडचणींमुळे ते काही उत्पादन मर्यादित करेल. गेल्या वर्षी रशिया ही स्कोडाची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ होती. स्कोडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील घडामोडी पाहता, युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये विक्रीत घट अपेक्षित आहे.

Advertisement

अमेरिकन ऑटोमेकर जनरल मोटर्स आणि स्वीडिश ऑटोमेकर व्हॉल्वो कार्स (Volvo Cars) म्हणाले की ते पुढील सूचना मिळेपर्यंत रशियाला होणारी सर्व वाहन निर्यात स्थगित करत आहेत. कंपनी रशियामध्ये दरवर्षी सुमारे 3,000 वाहने विकते आणि देशात कंपनीचा कोणताही प्रकल्प नाही. बीएमडब्ल्यूने रशियाला होणारी निर्यातही थांबवली आहे, कारण पुरवठ्यातील अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला, असे कंपनीने सांगितले.

Advertisement

Russia-Ukraine War : आता रशियन लोकांचेही होणार आर्थिक नुकसान.. युक्रेनने तयार केलाय ‘हा’ खास प्लान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply