Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : युद्धामुळे जगावर पुन्हा येऊ शकते ‘हे’ संकट; WHO ने दिलाय गंभीर इशारा..

दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. या युद्धात अजूनही कोणत्याही देशाने माघार घेतलेली नाही. युद्धातील विध्वंस सुरूच आहे. मात्र, या भयानक युद्धाचे चटके अवघ्या जगालाच बसत आहेत. तसेही युद्धाचे परिणाम कधीही चांगले होत नाही. नुकसानच होते. त्यात आताच्या आधुनिक काळात तर प्रत्येक देश दुसऱ्या देशावर काही प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या युद्धाचे दुष्परिणाम त्या देशांनाही सहन करावे लागत आहेत. भविष्यात कोणती संकटे या युद्धामुळे येणार याचा अंदाज आतापासूनच व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेची भर पडली आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्याने एक धोकादायक इशारा दिला आहे. हा इशारा म्हणजे आपणा सर्वांना काळजीत टाकणारा असाच आहे. संघटनेच्या अधिकाऱ्याने इशारा दिला, की युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कोविड-19 चा प्रसार होण्यास मदत होईल. संघटनेच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे संचालक डॉ. माइक रायन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, युक्रेनमधील परिस्थितीमुळे कोरोनाचा प्रसार आणखी सोपा होणार आहे. रायन म्हणाले की, जेव्हा तुम्ही समाजाला अशा प्रकारे विस्कळीत करता आणि लाख लोकांना भटकण्यास भाग पाडता तेव्हा त्याचा फायगा संसर्गजन्य रोग घेतात.

Advertisement

ते म्हणाले, की या युद्धाच्या परिस्थितीत लोक गर्दी करत आहेत. त्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. तसेच त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था होत नाही. ही परिस्थिती धोकादायक आहे. अशा लोकांना रोगांचे संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते आणि ते प्रथम संक्रमित होतात. रोगाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मंदावला असेल मात्र, धोका अद्याप कायम आहे. अशा वेळी थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला अडचणीत आणू शकतो. वास्तविक WHO (World Health Orgnisation) ने देखील याबाबत इशारा दिला आहे. WHO ने पुन्हा सांगितले, की हा घातक आजार अजूनही कायम आहे.

Advertisement

वास्तविक, काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला होता. Omicron जगभरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. तथापि, या व्हेरिएंटचा प्रभाव आधीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी होता त्यामुळे तो जास्त धोकादायक ठरला नाही. अशा परिस्थितीत, संसर्ग जितक्या वेगाने वाढला, तितक्या वेगाने तो कमीही झाला. त्याच वेळी, WHO च्या या इशाऱ्यानुसार, ‘कोरोना संपला असे नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये अजूनही तब्बल 83 टक्के लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. Omicron प्रकार मंद झाला आहे, परंतु तो अद्याप कायम आहे.

Advertisement

Corona Update : देशात कोरोनाचे रुग्ण पु्न्हा वाढले.. पहा, 24 तासात किती नवे रुग्ण सापडले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply