Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Video : आणि रशियन सैनिकाला फुटले रडू..! पहा युक्रेनीयन जनतेच्या मानवतावादाचे सर्वोत्तम उदाहरण

Please wait..

कीव / मॉस्को : युक्रेनच्या रस्त्यावर रक्त सांडणाऱ्या रशियन सैनिकांना पकडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता एका ताज्या प्रकरणात युक्रेनमध्ये एका रशियन सैनिकाला पकडण्यात आले आहे. यानंतर रशियन सैनिकाने आत्मसमर्पण केले. रशियन सैनिकाजवळ उपस्थित युक्रेनच्या लोकांनी माणुसकी दाखवत त्याला चहा आणि पेस्टी दिली. एका महिलेने त्याचे सांत्वन केले, त्याला तिचा फोन दिला आणि त्याला त्याच्या आईशी बोलण्यास सांगितले. आईचा आवाज ऐकून रशियन सैनिक रडू लागला. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

Advertisement
Loading...

या संपूर्ण घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक युक्रेनियन व्यक्ती म्हणतोय, ‘हे तरुण आहेत, त्यांचा दोष नाही. हे सैनिक इथे का आले आहेत ते कळत नाही. ते जुने नकाशे वापरत आहेत आणि हरवले आहेत. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रशियन सैनिकाच्या आत्मसमर्पणानंतर स्थानिक लोक त्याचे स्वागत करत जेवण देत असल्याचे दिसत आहे.’ या व्हिडिओचे कॅप्शन आहे, ‘रशियन सैनिकांनो आत्मसमर्पण करा, युक्रेनचे लोक तुम्हाला अन्न देतील. फक्त शरण जा.’ या बातमीत दावा केला जात आहे की, रशियन सैनिकांचे मनोधैर्य हरवले असून ते न लढता आत्मसमर्पण करत आहेत. असे आणखी बरेच व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात रशियन सैनिक रडत असल्याचे दिसत आहे आणि त्यांना युक्रेनमध्ये काय हवे आहे हे देखील माहित नाही. रेडिओ संदेशांमध्ये रशियन सैनिकांनी युक्रेनियन शहरांवर बॉम्ब टाकण्याचे आदेश धुडकावून लावले.

Advertisement

Advertisement

एवढेच नाही तर रशियन सैनिक अन्न आणि इंधन संपत असल्याची तक्रार करत आहेत. युक्रेनच्या सैन्याने आपल्या ध्वजाच्या समोर बसलेल्या पकडलेल्या रशियन सैनिकांचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे. यात जखमी रशियन सैनिकाने सांगितले की, हे आमचे युद्ध नाही. माता आणि पत्नींनो, तुमच्या पतींना एकत्र करा. इथे राहण्याची गरज नाही. दुसर्‍या व्हिडिओमध्ये एक पकडलेला रशियन कैदी युद्धामुळे झालेल्या मृत्यू आणि विनाशावर रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रशियन सैनिक आपल्याच सैन्यावर नाराजी व्यक्त करताना सांगतात की, ते मृतदेह उचलतही नाहीत आणि अंत्यसंस्कारही होत नाहीत. यातील एका सैनिकाने रशिया आणि युक्रेनला युद्धभूमीतून मुलांना हटवण्याची विनंती केली, तर दुसऱ्याने युद्ध कोणालाही नको असल्याचा इशारा दिला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply