Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानला मोठा झटका; पहा बॉम्बस्फोटात कोण आणि कितीजण झालेत ठार व जखमी

दिल्ली : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे बुधवारी पोलीस व्हॅनजवळ झालेल्या स्फोटात (Pakistan bomb blast) एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण ठार झाले, तर चोवीस जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Loading...
Advertisement

क्वेट्टा येथील फातिमा जिना रोडवर हा हल्ला झाला असून गुप्तचर माहितीनुसार या स्फोटात दोन ते अडीच किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. ऑपरेशन्सचे उपमहानिरीक्षक फिदा हुसेन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शहर पोलिस स्टेशनची पोलिस मोबाइल व्हॅन परिसरात होती तेव्हा संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. “हा स्फोट कसा झाला हे आम्हाला माहित नाही, परंतु स्फोटामुळे मोठे नुकसान झाले, त्यात तीन ठार झाले आणि पोलिस अधिकार्‍यांसह किमान दोन डझन लोक जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असे ते म्हणाले. व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या उपअधीक्षकाचाही या घटनेत मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply