Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : .. म्हणून युक्रेनच्या ‘या’ शहरात राहणार संचारबंदी; पहा, प्रशासनाने का घेतला हा निर्णय..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. या सात दिवसांच्या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. लाखो लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहेत. शहरी उद्धवस्त होत आहेत. विदेशातील नागरिकांचेही प्रचंड हाल होत आहेत. तरी देखील रशिया ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. युक्रेनमधील खार्किव शहरावर सातत्याने हमले होत आहेत. अशा परिस्थितीत या शहराच्या महापौरांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या शहरात आता गुरुवारी सकाळपर्यंत शहरात संचारबंदी लागू केली आहे. दुसरीकडे, खार्किवसाठी भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही दोनदा आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.

Advertisement

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमध्ये परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. रशियन सैनिक या शहरावर वेगाने क्षेपणास्त्र हमले करत आहेत. या भयानक परिस्थितीनंतर महापौरांनी शहरात 12 तासांची संचारबंदी लागू केली आहे. हा कर्फ्यू संध्याकाळी 7 ते सकाळी 7 असेल. दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाने खार्किव शहराबाबत दोनदा अॅडव्हायजरी जारी केली आहे. मंत्रालयाने स्पष्टपणे भारतीय नागरिकांना शहर त्वरीत सोडण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, आज या युद्धाचा सातवा दिवस आहे. रशियन सैन्य आणि युक्रेनमधील युद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. रशियन सैनिकांचे हमले थांबत नाहीत, तर दुसरीकडे युक्रेनचे सैनिकही हिंमतीने आघाडीवर उभे आहेत.

Advertisement

युक्रेन सुद्धा इतका जबरदस्त प्रतिकार करील, याचा अंदाज रशियाला कदाचित नव्हता. मात्र, युक्रेनियन सैनिकांनीही बळकट रशियाचा जबरदस्त प्रतिकार केला. त्यामुळे हे युद्ध आधिक वाढले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात धोकादायक युद्ध सुरू आहे. ज्याचा परिणाम वाहन उद्योगावरही होत आहे. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची योजना आखली आहे. याबरोबरच अनेक मोठमोठ्या वाहन कंपन्याही रशियातील आपला व्यवसाय बंद करत आहेत. हे प्रथम अमेरिकन ऑटो ब्रँड आणि स्वीडिश कार निर्माते GM (जनरल मोटर्स) आणि व्होल्वो यांनी सुरू केले होते. ज्याने तात्पुरत्या स्वरुपात रशियातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली.

Advertisement

जीएमने एका निवेदनात म्हटले आहे, की ते देशातील वाहन निर्यात निलंबित करत आहेत. “यावेळी आमचे विचार युक्रेनच्या लोकांबरोबर आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे. जीवितहानी ही एक शोकांतिका आहे आणि या भागातील लोकांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी काळजी आहे.’ GM रशियामध्ये दरवर्षी सुमारे 3,000 कार विक्री करते.

Advertisement

.. म्हणून युक्रेन एकटाच देतोय रशियाला टक्कर..! अमेरिका, ‘नाटो’ ने ऐनवेळी दिला झटका; पहा, काय आहेत नेमकी कारणे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply