Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : आता रशिया विरोधात रोज आंदोलने करा; पहा, रशियन जनतेला कुणी केलेय हे आवाहन..?

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अडचणी वाढू शकतात. तुरुंगात असलेले रशियातील विरोधी पक्षनेते नेव्हेल्नी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. युक्रेन-रशिया मुद्द्यावर त्यांनी सलग 12 ट्विट करत आपले म्हणणे मांडले आहे. तसेच पुतिन म्हणजे, रशिया नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

नेव्हेल्नी यांनी युक्रेनवरील आक्रमणाबद्दल रशियाच्या विरोधात मॉस्कोच्या रस्त्यावर नियमित निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या प्रवक्त्याने बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. युक्रेनच्या संकटाच्या वेळी, जेव्हा संपूर्ण जग रशियाच्या विरोधात आहे, तेव्हा नेव्हेल्नी यांचा निषेध पुतिन यांच्या अडचणीत भर टाकू शकतो.

Advertisement

नेव्हेल्नी यांनी रशियन जनतेला राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाविरोधात दररोज संध्याकाळी सात वाजता आणि शनिवार-रविवार दुपारी दोन वाजता त्यांच्या शहराजवळील चौकांमध्ये रस्त्यावर उतरून निषेध करण्याचे आवाहन केले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक मानल्या जाणाऱ्या नेव्हेल्नी यांना गेल्या वर्षी जर्मनीहून रशियाला परतल्यावर तुरुंगात टाकण्यात आले होते.

Advertisement

दुसरीकडे रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा आज सातवा दिवस आहे. रशियाच्या हमल्यात युक्रेनला मोठा फटका बसला आहे. राजधानी कीवमध्ये रशियाच्या हवाई हमल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. रशियाही सातत्याने क्षेपणास्त्रांनी हमले करत आहे. दरम्यान, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. जर तिसरे महायुद्ध झाले तर ते अणुयुद्ध असेल, असे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सांगितले. हे अत्यंत विनाशकारी युद्ध असेल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात धोकादायक युद्ध सुरू आहे. ज्याचा परिणाम वाहन उद्योगावरही होत आहे. अनेक देशांनी रशियाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची योजना आखली आहे. याबरोबरच अनेक मोठमोठ्या वाहन कंपन्याही रशियातील आपला व्यवसाय बंद करत आहेत. हे प्रथम अमेरिकन ऑटो ब्रँड आणि स्वीडिश कार निर्माते GM (जनरल मोटर्स) आणि व्होल्वो यांनी सुरू केले होते. ज्याने तात्पुरत्या स्वरुपात रशियातील आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली.

Advertisement

जीएमने एका निवेदनात म्हटले आहे, की ते देशातील वाहन निर्यात निलंबित करत आहेत. “यावेळी आमचे विचार युक्रेनच्या लोकांबरोबर आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे. जीवितहानी ही एक शोकांतिका आहे आणि या भागातील लोकांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी काळजी आहे.’ GM रशियामध्ये दरवर्षी सुमारे 3,000 कार विक्री करते.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे चीन होतोय हैराण; पहा, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय दिलेय कारण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply