Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : अमेरिकेने रशिया विरोधात केलीय ‘ही’ मोठी कारवाई; पहा, अमेरिकेने नेमके काय केले..?

दिल्ली : अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातील (United Nations) 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या रशियन मुत्सद्दींवर हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील यजमान देश मूलभूत वचनबद्धतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत रशियाने या कारवाईला जोरदार विरोध केला आहे. तसेच अमेरिकेवर आरोपही केला आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमेरिकेने संयुक्त राष्ट्र आणि रशियन स्थायी मिशनमधून बारा रशियन राजनयिकांना काढून टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या सर्वांवर हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. रशियाचे म्हणणे आहे, की त्यांच्या राजनैतिक अधिकारांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

Advertisement

युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युरोपीय देशांसह अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध टाकले आहेत. रॉयटर्स, कॅनडा या वृत्तसंस्थेनुसार, युरोपियन युनियनने सर्व रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियनने असेही म्हटले आहे, की ते रशियाच्या राज्य माध्यमांना अवरोधित करण्याचा आणि त्याचा मित्र देश बेलारूसवर निर्बंध टाकण्याचा विचार करेल.

Loading...
Advertisement

विशेष म्हणजे, युरोपियन युनियनमध्ये 27 देश आहेत. यापैकी फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, जर्मनी, अल्बेनिया, स्लोव्हेनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, रोमानिया, लक्झेंबर्ग यासह बहुतांश देशांनी रशियन विमानांसाठी त्यांचे हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, फ्रेंच एअरलाइन एअर फ्रान्सनेही सुरक्षेच्या कारणास्तव रशियाला जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

युरोपीय देशांबरोबरच कॅनडाही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद करणाऱ्या देशांमध्ये सामील झाला आहे. तथापि, स्पेन, ग्रीस, सर्बिया आणि तुर्कीसह काही देशांनी अद्याप रशियन विमानांसाठी त्यांचे हवाई मार्ग बंद करण्याची घोषणा केलेली नाही.

Advertisement

बाब्बो.. रशिया-युक्रेन युद्धाचा ‘असा’ घातक इफेक्ट; ‘येथे’ पेट्रोल गेलेय 200 पार; पहा, कुठे उडालाय इंधनाचा भडका..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply