Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : म्हणून ब्रिटेन घाबरलाय रशियाला..पहा, काय केलीय मोठी घोषणा..?

मुंबई : युद्धाचा सामना करत असलेल्या युक्रेनची ब्रिटनने निराशा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी रशियाविरुद्ध आपले सैन्य उतरवण्यास नकार दिला. जॉन्सन म्हणाले की, आम्ही युक्रेनमध्ये रशियन सैन्याशी लढणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) सदस्य देशांच्या नेत्यांना सांगितले की, त्यांचा देश लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यावर रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या विरोध थेट निर्बंध टाकणार आहे.

Advertisement

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनियन नागरिकांच्या नातेवाईकांना यूके व्हिसा देऊ केला आहे. रशियन आक्रमणानंतर देश सोडून जाणारे युक्रेनियन लोक ब्रिटनमध्ये येऊ शकतात, ज्यांचे कुटुंबीय आधीच ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत, असे जॉन्सन यांनी जाहीर केले आहे. याचा फायदा हजारो लोकांना होईल जे सध्या त्यांच्या भविष्याबद्दल पर्याय शोधत आहेत.

Advertisement

जॉन्सन म्हणाले, की ‘युक्रेनमधील संकटाच्या या घडीला ब्रिटन पाठ फिरवणार नाही. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सर्व काही धोक्यात घालणाऱ्या युक्रेनियन लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व शक्य आर्थिक आणि लष्करी सहाय्य देत आहोत. जॉन्सन मंगळवारी युक्रेनच्या शेजारी आणि ब्रिटनचे युरोपियन मित्र देश दौर्‍यावर रवाना झाले, जे रशियाशी संघर्ष करत आहेत. या दौऱ्यात जॉन्सन युरोपियन सुरक्षा आणि स्थैर्याबाबत चर्चा करणार आहेत.

Advertisement

युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चात्य देशांकडून सातत्याने निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाला लवकरच आणखी एक मोठा झटका बसू शकतो. ब्रिटनने म्हटले आहे, की रशियाबाबत आमच्यासमोरील पर्यायांपैकी रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून (UNSC) वगळणे हा आहे. याआधी ब्रिटननेही रशियाशी संबंधित कोणत्याही जहाजांना आपल्या बंदरात प्रवेश देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याच वेळी, एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी, ब्रिटनने म्हटले होते, की रशियाचा ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाला प्रवेश देऊ नये.

Loading...
Advertisement

पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे युक्रेनबाबत रशियाची भूमिका बदलणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या या आक्रमणाला निर्विवाद दहशतवाद आणि त्याच्या लष्करी कारवाईला युद्ध गुन्हा म्हटले आहे.

Advertisement

याआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याची विनंती केल्यानंतर युरोपियन संसदेने तत्काळ अर्ज मंजूर केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोमवारी युक्रेनच्या युरोपियन युनियनमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. युनियनने फक्त एकाच दिवसात निर्णय घेत हा अर्ज मंजूर केला आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : .. तर रशियावर होऊ शकते आणखी मोठी कारवाई.. पहा, काय इशारा दिलाय ब्रिटेनने..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply