Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : .. तर रशियावर होऊ शकते आणखी मोठी कारवाई.. पहा, काय इशारा दिलाय ब्रिटेनने..?

दिल्ली : युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चात्य देशांकडून सातत्याने निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाला लवकरच आणखी एक मोठा झटका बसू शकतो. ब्रिटनने म्हटले आहे, की रशियाबाबत आमच्यासमोरील पर्यायांपैकी रशियाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून (UNSC) वगळणे हा आहे. याआधी ब्रिटननेही रशियाशी संबंधित कोणत्याही जहाजांना आपल्या बंदरात प्रवेश देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याच वेळी, एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी, ब्रिटनने म्हटले होते, की रशियाचा ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाला प्रवेश देऊ नये.

Advertisement

पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे युक्रेनबाबत रशियाची भूमिका बदलणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या या आक्रमणाला निर्विवाद दहशतवाद आणि त्याच्या लष्करी कारवाईला युद्ध गुन्हा म्हटले आहे.

Advertisement

याआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याची विनंती केल्यानंतर युरोपियन संसदेने तत्काळ अर्ज मंजूर केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोमवारी युक्रेनच्या युरोपियन युनियनमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. युनियनने फक्त एकाच दिवसात निर्णय घेत हा अर्ज मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या अर्जावर पुढील कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली आहे. रशियाची कोंडी करण्याच्या उद्देशाने युरोपियनय युनियनने इतक्या कमी वेळात हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

आता युक्रेनला युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी युरोपियन संसदेत विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये युक्रेनचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर संसद मतदान करणार आहे. याआधी मंगळवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेला संबोधित करताना सांगितले की युक्रेन “युरोप समान सदस्य होण्यासाठी” संघर्ष करत आहे. “आम्ही युरोपियन युनियनचे सदस्य होण्यासाठी देखील लढत आहोत,” असे त्यांनी EU संसदेत आपल्या भाषणा दरम्यान सांगितले होते.

Advertisement

तिकडे युक्रेन-रशिया युद्ध.. इकडे मात्र अमेरिकेवर भडकलाय चीन; पहा, आता अमेरिकेने कसा दिलाय झटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply