तिकडे युक्रेन-रशिया युद्ध.. इकडे मात्र अमेरिकेवर भडकलाय चीन; पहा, आता अमेरिकेने कसा दिलाय झटका..
दिल्ली : रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तैवान बद्दलही सतत अपडेट्स येत असतात. तैवानवरून चीनने पुन्हा एकदा अमेरिकेला फटकारले आहे. जो बिडेन सरकारचे संरक्षण दल तैवानमध्ये पोहोचल्यानंतर चीनने अमेरिकेला मोठी किंमत द्यावी लागेल, असा इशारा दिला आहे. तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवण्याच्या प्रयत्नांची किंमत अमेरिकेला द्यावी, असे चीनने म्हटले आहे.
रशियाने ज्या प्रकारे युक्रेनवर हमला केला, त्याच पद्धतीने चीन तैवानवर आक्रमण करून त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेचे माजी जॉइंट चीफ ऑफ स्टाफ माइक अॅडमिरल यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय शिष्टमंडळ तैवानला पोहोचले आहे. तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ हे देखील तैवानमध्ये येत आहेत.
तैवानच्या अमेरिके बरोबरच्या वाढत्या सहकार्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीन तैवानवर आपला अधिकार सांगत आहे, जरी तैवानचे लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. अलिकडच्या काही महिन्यांत चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात शेकडो लढाऊ विमाने पाठवली आहेत. तसेच चीन तैवान विरोधात आपली लष्करी तयारी तीव्र करत आहे.
अमेरिकी अधिकाऱ्यांच्या तैवान दौऱ्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे की, चीनचे लोक राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. तैवानला पाठिंबा दर्शविण्याचा अमेरिकेचा कोणताही प्रयत्न व्यर्थ ठरेल. चीनने अमेरिकेला एक चीन तत्त्वाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
रशिया युक्रेनच्या युद्धात तैवान आलाय धोक्यात..! पहा, चीनच्या भीतीने अमेरिकेने घेतलाय ‘हा’ निर्णय..