Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेनने मागणी केली.. युरोपीय देशांनी तत्काळ दिली मंजुरी; पहा, आता युक्रेन कोणत्या गटाचा होणार सदस्य..?

दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याची विनंती केल्यानंतर युरोपियन संसदेने तत्काळ अर्ज मंजूर केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोमवारी युक्रेनच्या युरोपियन युनियनमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. युनियनने फक्त एकाच दिवसात निर्णय घेत हा अर्ज मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या अर्जावर पुढील कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली आहे. रशियाची कोंडी करण्याच्या उद्देशाने युरोपियनय युनियनने इतक्या कमी वेळात हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

आता युक्रेनला युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी युरोपियन संसदेत विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये युक्रेनचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर संसद मतदान करणार आहे. याआधी मंगळवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेला संबोधित करताना सांगितले की युक्रेन “युरोप समान सदस्य होण्यासाठी” संघर्ष करत आहे. “आम्ही युरोपियन युनियनचे सदस्य होण्यासाठी देखील लढत आहोत,” असे त्यांनी EU संसदेत आपल्या भाषणा दरम्यान सांगितले होते.

Advertisement

झेलेन्स्की म्हणाले, की आम्ही हे सिद्ध केले आहे की, किमान, आम्ही तुमच्यासारखेच आहोत. ज्यावेळी जोरदार युद्ध सुरू आहे अशा वेळी युक्रेन सुद्धा जोरदार संघर्ष करत आहे. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले आणि या पूर्व युरोपीय देशात मोठा विध्वंस घडला आहे. रशियाचे हमले अजूनही सुरुच आहेत. या युद्धामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यांना दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. तरी देखील हुकुमशहा रशियाने युद्ध थांबवण्याचा विचार केल्याचे दिसत नाही. रशियाने जे निश्चित केले आहे ते साध्य होईपर्यंत युद्ध कदाचित थांबणार नाही, असे दिसत आहे. मात्र, रशियाने युद्ध थांबवावे, यासाठी जगभरातील देश, आंतरराष्ट्रीय संस्था जोरदार प्रयत्न करत आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेनवर भयानक हमला करणाऱ्या रशियाला जगात एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी या सभेला मार्गदर्शन करत असतानाच अनेक देशांचे नेते या सभेतून उठून निघून गेले. वास्तविक, लावरोव्ह यांचा आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ संदेश सभेत ऐकवण्यात येणार होणार होता.

Advertisement

त्यानंतर अनेक देशांचे नेते ते सुरू होताच निघून गेले. रशियावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता. वॉकआउटचे नेतृत्व करणारे युक्रेनचे राजदूत येव्हानिया फिलिपेन्को म्हणाले, की “युक्रेनियन लोकांना तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.” त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही हा पाठिंबा दिला आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : UN मध्ये रशिया पडला एकाकी ? ; पहा, बाकीच्या देशांनी सभेत नेमके काय केले..

Advertisement
Advertisement

Leave a Reply