Russia-Ukraine War : UN मध्ये रशिया पडला एकाकी ? ; पहा, बाकीच्या देशांनी सभेत नेमके काय केले..
मुंबई : युक्रेनवर भयानक हमला करणाऱ्या रशियाला जगात एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी या सभेला मार्गदर्शन करत असतानाच अनेक देशांचे नेते या सभेतून उठून निघून गेले. वास्तविक, लावरोव्ह यांचा आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ संदेश सभेत ऐकवण्यात येणार होणार होता.
त्यानंतर अनेक देशांचे नेते ते सुरू होताच निघून गेले. रशियावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता. वॉकआउटचे नेतृत्व करणारे युक्रेनचे राजदूत येव्हानिया फिलिपेन्को म्हणाले, की “युक्रेनियन लोकांना तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.” त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही हा पाठिंबा दिला आहे.
फ्रान्सचे राजदूत जेरोम बेनाफॉंट म्हणाले की, कोणताही हमला मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होत असून मानवी हक्क दुर्लक्षित होत आहे. मानवाधिकार परिषद युक्रेन आणि तेथील लोकांसोबत असल्याचे या वॉकआऊटवरून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. याच्या काही काळाआधी निशस्त्रीकरणावरील परिषदेत लाव्हरोव्ह यांचे भाषण प्रसारित होणार होते, त्यावरही युरोपीय देशांनी बहिष्कार टाकला होता. अनेक देशांचे मुत्सद्दी चेंबरच्या बाहेर जमले होते आणि तेथे युक्रेनचा ध्वज फडकत होता. येथे त्याने युक्रेनची जोरदार प्रशंसा केली आणि रशियाची निंदा केली.
मात्र, या बहिष्काराच्या वेळीही येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशिया येथील मुत्सद्दींनी बसून रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे म्हणणे ऐकले. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री मंगळवारी जिनिव्हा येथे येणार होते. मात्र युरोपीय देशांनी घातलेल्या बंदीचा हवाला देत त्यांनी आपला दौरा रद्द केला. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर युद्ध अपराध केल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी रशियाच्या या क्रौर्याला कोणीही विसरणार नाही किंवा माफ करणार नाही, असे ते म्हणाले.
रशिया युक्रेनच्या युद्धात तैवान आलाय धोक्यात..! पहा, चीनच्या भीतीने अमेरिकेने घेतलाय ‘हा’ निर्णय..