दिल्ली : रशियाने युक्रेनवर हमला केल्यानंतर चीन तैवानच्या बाबतीतही असेच काहीतरी करू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. कारण, चीन सातत्याने रशियाला पाठिंबा देत आहे. तसेच तैवान आपलाच अविभाज्य भाग असल्याचे सातत्याने सांगत असतो. मात्र, तैवानने हे कधीच मान्य केले नाही. आता मात्र, रशिया आणि युक्रेनच्या युद्धानंतर तैवानलाही चीनचा धोका वाढला आहे.
या घटना भविष्यात घडू शकतात, याची शक्यता दिसत असल्याने अमेरिका सतर्क झाला आहे. त्यामुळे तैवानच्या बाबतीत अमेरिकेने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकार्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी तैवानमध्ये पोहोचेल. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते तैवानचे अध्यक्ष आणि अन्य अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
या शिष्टमंडळा व्यतिरिक्त अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ बुधवारी तैवानला पोहोचतील, असे परराष्ट्र विभागाने सांगितले. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीचे माजी अध्यक्ष पोम्पिओ हे शनिवारी येथून निघण्याआधी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटतील. माजी परराष्ट्र सचिव पोम्पिओ यांच्या भेटीमुळे तैवानसाठी अमेरिकेच्या भक्कम समर्थनाला त्यांचा पूर्ण द्विपक्षीय पाठिंबा दिसून येतो,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर, चीन बळाचा वापर करून स्वशासित लोकशाही तैवानचा ताबा घेण्याची भीती वाढली आहे. चीन तैवानवर दावा करतो. 1949 मध्ये गृहयुद्धानंतर तैवान राजकीयदृष्ट्या मुख्य चिनी भूभागापासून वेगळा झाला. त्याचे केवळ 15 औपचारिक राजनैतिक सहकारी आहेत. चीनने गेल्या वर्षभरापासून तैवानमध्ये घुसखोरीत वाढ केली आहे.
याशिवाय चीन रशियालाही पाठिंबा देत आहे. युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करत चीननेही रशियाची बाजू घेतली. नाटोसारख्या संघटनांचे नाव न घेता ते म्हणाले की, रशियाला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. याबरोबरच युक्रेनवरील आक्रमणामुळे जगभरातील देश रशियावर निर्बंध टाकत असताना चीन अजूनही हे निर्बंध योग्य नाहीत, असे सांगत आहे.
Russia-Ukraine War : रशियासाठी चीनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अमेरिकेवर केलाय मोठा आरोप..