दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 5 वा दिवस आहे. या दरम्यान घटना वेगाने घडत आहेत. युद्धाच्या काळात रशिया सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, रशियाने 36 देशांच्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध ब्रिटेन आणि जर्मनीसारख्या देशांमधून येणाऱ्या फ्लाइटवर लागू होणार आहेत. देशाच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे.
युरोपियन युनियनने रशियन एअरलाईन्ससाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियाचा निर्णय आला आहे. दरम्यान, युरोपियन युनियनच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र संघाचा (United Nations) दौरा रद्द केला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने रशियन मिशनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
याआधी रविवारी, युरोपियन युनियनचे मुख्य कार्यकारी म्हणाले, की 27 देशांच्या संघटनेने रशियन एअरलाइन्ससाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा आणि युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्याच्या निषेधार्थ क्रेमलिनच्या काही माध्यमांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जात आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्याने जग दोन गटात विभागले आहे. एकीकडे भारतासारखा देश तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे, तर चीन आणि पाकिस्ताननेही अंतर ठेवले आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी असे पाश्चिमात्य आणि युरोपीय देश उघडपणे रशियाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यातील अनेक देशांनी युक्रेनला लष्करी शस्त्रे आणि इतर मदत देण्याचे सांगितले आहे. नाटो प्रमुखांनी सोमवारी युक्रेनला रणगाडाविरोधी शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याची घोषणा केली. आतापर्यंत एकूण 21 देशांच्या वतीने युक्रेनला मदत जाहीर करण्यात आली आहे.
Russia-Ukraine war: बाब्बो.. रशियाने वापरलाय ‘तो’ घातक बॉंब..! पहा नेमके काय दिसत्येय व्हिडिओमध्ये