Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine war: बाब्बो.. रशियाने वापरलाय ‘तो’ घातक बॉंब..! पहा नेमके काय दिसत्येय व्हिडिओमध्ये

Please wait..

कीव / मॉस्को : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये आपलाच देश ग्रेट असल्याच्या विचारांनी ग्रस्त झालेल्या नेत्यांनी युद्ध लादले आहे. रशियाचे हुकुमशहा व्लादिमिर पुतीन यांनी हे युद्ध पुकारले आहे. नाटो देशांचा युक्रेन देशामध्ये असलेला रस आणि त्यामुळे निर्माण होणारे राजकीय प्रश्न यामुळे हे युद्ध पेटले. मात्र, यात अमेरिका नावाचा बलाढ्य देश आता युक्रेनला मदत न करता शांत बसला आहे. कारण, इतर कोणताही देश युद्धात उतरल्यास थेट अणुयुद्धाची धमकी रशियाने दिली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये आता व्हॅक्युम बॉंब वापरण्यास सुरुवात केल्याचा दावा होत आहे.

Advertisement
Loading...

युक्रेन वर्ल्ड नावाच्या माध्यम समूहाने ट्विटरवर म्हटले आहे की, “सुमी प्रदेश (उत्तर युक्रेन) मध्ये इंधन डेपोवर व्हॅक्यूम बॉंब टाकण्यात आला आहे. यात डेपो नष्ट झाला आहे. या प्रकारच्या शस्त्राला सर्वात घातक नॉन-न्यूक्लियर बॉम्ब म्हणून ओळखले जाते. त्याचा वापर जिनेव्हा कन्व्हेन्शनद्वारे प्रतिबंधित आहे.” आता याकडे जगाचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. त्यामुळे जागतिक समुदाय याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply