Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : युक्रेन आणि रशियाला ‘या’ देशांनी दिलाय पाठिंबा.. पहा, युद्धाचा धोका कसा वाढतोय..?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण, रशिया ताकदवान असला तरी युक्रेनेनेही तितकाच जोरदार प्रतिकार चालवला आहे. या युद्धात युक्रेनला अमेरिका आणि युरोपीय देशही आता मदत करत आहेत. त्यामुळे युद्धाची तीव्रता वाढत आहे. या युद्धामुळे आता जग सुद्धा दोन गटात विभागल्याचे दिसत आहे.

Advertisement

सोमवारी बेलारूसने रशियन सैन्याबरोबर युद्धात उतरणार असल्याचे सांगितले आहे. तर युक्रेनला लॅटव्हियाचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. लॅटव्हियाच्या संसदेने एकमताने ठराव संमत केला की जर तेथील नागरिकांना युक्रेनला युद्धात मदत करायची असेल तर त्यांना तसे करण्याची परवानगी आहे. लॅटव्हियाच्या संसदेच्या संरक्षण, गृह व्यवहार समितीचे अध्यक्ष ज्युरीस रँकानीस म्हणाले, की “युक्रेनला मदत करू इच्छिणारे आणि युक्रेनच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणारे आमचे नागरिक, तसे करण्यास स्वतंत्र असतील.

Advertisement

लॅटव्हिया हा नाटो संघटनेचा भाग होता आणि एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग होता. अशा स्थितीत त्यांची ही घोषणा महत्त्वाची ठरते आणि रशियाकडून लॅटव्हियावर कोणताही हमला झाला तर नाटो देशही युद्धात उतरू शकतात. असे झाले तर ते महायुद्ध सुरू झाल्यासारखे होईल. युक्रेन आणि रशिया यांच्यातील 5 दिवसांचे युद्ध आतापर्यंत दुतर्फा होते, परंतु बेलारूस आणि लॅटव्हियाच्या घोषणेने चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान, युक्रेनमधील लोक वेगाने स्थलांतर करत आहेत. लोक आपली घरे सोडून शेजारी देशांमध्ये जात आहेत. आतापर्यंत साडेतीन लाख लोक बेघर झाले आहेत.

Loading...
Advertisement

रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांमध्ये आज बेलारूसमध्ये चर्चा होईल. या संकटाच्या काळात भारताने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले ​​आहेत. भारत सरकारने विद्यार्थ्यांना आणि इतरांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. यामुळे केंद्र सरकारचे 4 मंत्री हे युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊन भारतीयांना बाहेर पडण्यासाठी मदत करणार आहेत.

Advertisement

Russia-Ukraine War : रशियासाठी चीनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अमेरिकेवर केलाय मोठा आरोप..

Advertisement
Advertisement

Leave a Reply