Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशियाबरोबर चर्चा करण्यास युक्रेन तयार.. पण, राष्ट्राध्यक्षांनी ठेवलीय ‘ही’ अट..

दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बेलारूसमध्ये रशियाबरोबर चर्चा करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, की त्यांचा देश रशियाशी शांतता चर्चा करण्यास तयार आहे, परंतु बेलारूस येथे चर्चा होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी एका संदेशात वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापेस्ट किंवा बाकू यांना चर्चेची पर्यायी जागा म्हणून नाव दिले. ते म्हणाले, की चर्चा इतर ठिकाणी होऊ शकते परंतु युक्रेन बेलारूसमध्ये चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

क्रेमलिनने रविवारी सांगितले, की युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ बेलारुस येथील होमेल शहरात पोहोचले आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, की शिष्टमंडळात लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दींचा समावेश आहे. ते म्हणाले, की रशियन शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार आहे आणि आम्ही युक्रेनच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत.

Advertisement

त्याचवेळी युद्धा दरम्यान रशियन सैन्य युक्रेनमध्ये मोठा विनाश घडवत आहे. युक्रेनचे गृहमंत्री अँटोन गेराशेन्को यांचे मार्गदर्शकांनी रविवारी सांगितले की, रशियन सैन्याने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमध्ये प्रवेश केला आहे. गेराशेन्को यांनी द गार्डियनच्या हवाल्याने म्हटले आहे, की शहरातील हायड्रोपार्क परिसरासह इतर अनेक ठिकाणी गोळीबार केला जात आहे. रशियन विशेष दलाचा एक गट शहरात दाखल झाला होता.

Loading...
Advertisement

खार्किव प्रादेशिक राज्य प्रशासनाचे अध्यक्ष ओलेग सिनेगुबोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर अनेक भागात त्यांची उपस्थिती दिसून आली आहे. याआधी रविवारी रशियन सुरक्षा दलांनी खार्किवमध्येच नैसर्गिक वायू पाइपलाइनचा स्फोट केला. दरम्यान, युक्रेनचे मेजर जनरल बोरिस क्रेमेनेत्स्की यांनी सांगितले की, युक्रेनने सुमारे 200 रशियन सैनिकांना पकडले आहे, त्यापैकी काहींचे वय 19 पेक्षा जास्त नाही.

Advertisement

Russia-Ukraine War : युक्रेनने रशियावर केलाय मोठा आरोप; पहा, रशियाने काय-काय केलेय टार्गेट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply