Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेनच्या ‘त्या’ नकाराने रशिया भडकला..! पुतिन यांनी रशियन सैन्याला दिलेत ‘हे’ आदेश; पहा, काय सुरू आहेत आरोप-प्रत्यारोप

दिल्ली : रशियाने आपल्या सैन्याला युक्रेनवर चारही दिशांनी हमला करण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेन बरोबर चर्चा होईल, असा अंदाज असल्यामुळे याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाया तात्पुरत्या थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, युक्रेनच्या नेतृत्वाने चर्चा करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या रशियाने शनिवारी दुपारी पुन्हा ऑपरेशन सुरू केले.

Advertisement

आता रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव शहरात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. संघर्ष आधिक तीव्र झाला आहे. संघर्ष वाढत असताना युक्रेनियन आता नवीन ठिकाणी आश्रय शोधत आहेत. अशा परिस्थितीत येथून निघून जाण्याचा अमेरिकेने दिलेला प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्वीकारण्यास नकार दिला आणि राजधानीतच राहण्याचा आग्रह धरला. युक्रेनियन अधिकार्‍यांनी रशियन आक्रमण रोखण्यात काही प्रमाणात यश आल्याची माहिती दिली.

Advertisement

दोन दिवसांच्या लढाईनंतर झालेल्या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शाळा आणि अपार्टमेंट इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनचे सरकार उलथून टाकून ते आपल्या अधीन करण्यास कटिबद्ध असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत आहे. रशियाचा दावा आहे, की युक्रेनवरील हमला केवळ लष्करी लक्ष्यांवर आहे, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपमधील सर्वात मोठ्या युद्धात शेकडो नागरिक ठार झाले आहेत तर बरेचसे जखमी झाले आहेत.

Advertisement

कीवचे महापौरांनी सांगितले की, कीवच्या दोन नागरी विमानतळाजवळील एका उंच इमारतींवर क्षेपणास्त्र आदळल्याने इमारतीचे नुकसान झाले. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सहा नागरिक जखमी झाले आहेत. संघर्षामुळे हजारो युक्रेनियन लोकांनी आपली घरे सोडली आहेत. UN अधिकार्‍यांनी सांगितले की युक्रेनमधून आतापर्यंत 120,000 हून अधिक लोकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशियाने शनिवारी आपल्या सैन्याला युक्रेनमधील कारवाया तीव्र करण्यास सांगितले. कीवने वाटाघाटी करण्यास नकार दिल्याचा आरोप रशियाने युक्रेनवर केला. त्यानंतर आता युक्रेनला सर्व बाजूंनी घेरले जाईल. याआधी युक्रेनने रशियाकडून कोणत्याही चर्चेचा प्रस्ताव न दिल्याचा आरोप केला होता.

Advertisement

युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रमुख मिखाईल पोडोलियाक यांनी रशियावर आपल्या बाजूने चर्चेची ऑफर दिल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले, की व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला चर्चेसाठी युद्ध थांबवण्यास सांगितले होते. परंतु युक्रेनने नकार दिला. याबाबत मिखाईल म्हणाले की, आम्ही कोणत्याही चर्चेची शक्यता नाकारली नाही. ते म्हणाले, की युक्रेन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की रशियाच्या बाजूची कोणतीही अट नाकारत आहेत.

Advertisement

युक्रेनच्या राजधानीचे शहर संकटात..! रशियन सैन्याला रोखण्यासाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply