Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाच्या संकटात अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत.. ‘त्यासाठी’ देणार तब्बल 350 दशलक्ष डॉलर्स..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Russia-Ukraine War) आज तिसरा दिवस आहे. रशियन फौजा आता राजधानी कीव शहराकडे वाटचाल करत आहेत. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी देशभरात जोरदार प्रतिकार सुरू ठेवला आहे. ब्रिटेनच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. युद्धा दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की आम्ही कीव आणि शहराच्या प्रत्येक महत्त्वाच्या परिसरावर नियंत्रण ठेवत आहोत.

Advertisement

यानंतर आता युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने युक्रेनला मोठी मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे की, युक्रेनला संरक्षण विभाग अतिरिक्त $350 दशलक्ष तात्काळ लष्करी मदत देईल. अमेरिकेने मदतीची घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे.

Advertisement

देशातील अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत. एक लाखांपेक्षा जास्त लोकांना आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये निर्वासित म्हणून राहणे भाग पडले आहे. आणि विशेष म्हणजे, युद्ध सुरू होण्याआधी अमेरिका, नाटो संघटना आणि युरोपीय देशांनी युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या घोषणा केल्या होत्या, रशियालाही धमक्या दिल्या होत्या. ऐनवेळी मात्र या देशांनी युक्रेनला वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे आज हा देश अत्यंत भीषण संकटात सापडला आहे.

Loading...
Advertisement

दुसरीकडे, पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध टाकले आहेत. यावर रशियाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी दिमित्री मेदवेदेव म्हणाले की, रशियाला आता पाश्चिमात्य देशांबरोबर राजनैतिक संबंधांची गरज नाही.

Advertisement

दरम्यान, रशियन मालवाहू जहाज जप्त केल्याप्रकरणी फ्रान्समधील रशियन दूतावासाने फ्रेंच अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. रशियाच्या RIA वृत्तसंस्थेने शनिवारी दूतावासाच्या हवाल्याने ही माहिती दिली. फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले, की युक्रेनमधील युद्धाशी संबंधित व्यापार निर्बंधांकडे दुर्लक्ष केल्याचा संशय असलेले जहाज रशियन कंपनीचे असू शकते. जहाज शनिवारी पहाटे फ्रेंच सागरी पोलिसांनी जप्त केले आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईमुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने सर्वप्रथम आर्थिक निर्बंध लादले. त्याच वेळी, श्रीमंत वर्गातील लोकांवर बंदी घालण्यात आली आणि आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यावर प्रवास बंदी जाहीर केली आहे.

Advertisement

यु्क्रेनने पुन्हा भारताकडे मागितलीय मदत; रशियाला रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी भारताला केलेय ‘हे’ आवाहन..

Advertisement
Advertisement

Leave a Reply