Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

यु्क्रेनने पुन्हा भारताकडे मागितलीय मदत; रशियाला रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी भारताला केलेय ‘हे’ आवाहन..

दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर या देशावर भीषण संकट कोसळले आहे. रशियन फौजा आता थेट देशाच्या राजधानीकडे निघाल्या आहेत. कीव शहर केव्हाही ताब्यात घेतील, अशी परिस्थिती आहे. युद्ध सुरू होण्याआधी मोठ्या घोषणा करणारे, रशियाला धमक्या देणारे युरोपीय देश आणि खुद्द अमेरिकेने युक्रेनला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले आहे.

Advertisement

आज संकटात असताना कुणीही या देशाची मदत करण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत युक्रेनने पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली आहे. याआधीही युक्रेनने भारताकडे मदत मागितली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करावी, असे आवाहन युक्रेनने केले होते. त्यानंतर आता पुन्हा युक्रेनच्या राष्ट्रपतींनी भारताकडे मदत मागितली आहे.

Advertisement

भीषण संकटात सापडलेला देश युक्रेन आता जगभरातून मदत मागत आहे. अध्यक्ष जेलेन्स्की यांनी भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली. जेलेन्स्की यांनी पीएम मोदींना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. जेलेन्स्की यांनी ट्विट केले की, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संवाद साधला आहे. आपल्या देशात एक लाखांपेक्षा जास्त आक्रमणकारी दाखल झाले आहेत. आमच्या संभाषणा दरम्यान, आम्ही पंतप्रधान मोदींना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आम्हाला राजकीय पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशिया विरोधात प्रस्ताव आणला गेला होता. मात्र, या प्रस्तावावर मतदानाच्या वेळी भारत, चीन आणि युएई हे देश उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर भारताच्या या निर्णयाचे रशियाने कौतुक करत आभार मानले. अमेरिकेनेही यावर प्रतिक्रिया देताना यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही, असे म्हटले होते. भारताच्या या निर्णयाने युक्रेनला मात्र झटका बसला होता.

Advertisement

कारण, युक्रेनने याआधीही भारताकडे मदत मागितली होती. मात्र, रशिया हा भारताचा जुना आणि तितकाच विश्वासपात्र मित्र आहे. भारताच्या संकटाच्या काळात रशियाने जगाचा विचार न करता अनेकदा भारताला मदत केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या बाजूने आपल्या व्हेटो अधिकाराचा वापर केला. अशा परिस्थितीत रशियाविरोधात निर्णय घेणे भारताला शक्य नव्हते. त्यानंतर आता थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीच भारताकडे मदत मागितली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता भारताचे काय धोरण राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

.. म्हणून युक्रेन एकटाच देतोय रशियाला टक्कर..! अमेरिका, ‘नाटो’ ने ऐनवेळी दिला झटका; पहा, काय आहेत नेमकी कारणे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply