UNSC मध्ये घडलाय मोठा प्रकार..! रशियाने मानले भारताचे आभार; अमेरिकेनेही दिलेय ‘हे’ प्रत्युत्तर..
दिल्ली : रशियाच्या विरोधात आणलेल्या निषेधाच्या प्रस्तावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) मतदान झाले. भारताने या मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. रशियाने व्हेटो वापरून हा प्रस्ताव मागे घेतला. या भूमिकेबद्दल रशियाने भारताचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेनेही आम्हाला याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने म्हटले आहे की, भारताचे रशिया बरोबरील संबंध अमेरिका आणि रशियामधील संबंधांपेक्षा वेगळे आहेत. यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही. अमेरिकेने असेही म्हटले आहे, की त्यांनी रशियाशी संबंध असलेल्या प्रत्येक देशाला नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आपला प्रभाव वापरण्यास सांगितले आहे.
परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, अमेरिकेचे भारताबरोबर महत्त्वाचे हितसंबंध आणि मूल्ये जोडलेली आहेत. प्राइस यांनी शुक्रवारी एका दैनिक पत्रकार परिषदेत सांगितले की, “आमचे भारताबरोबर महत्त्वाचे हितसंबंध जोडलेले आहेत. आम्हाला माहीत आहे की भारताचे रशियाबरोबरील संबंध वेगळे आहेत. खरं तर त्यात काही अडचण नाही.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईची घोषणा केली आणि तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. या आक्रमणामुळे रशियावर टीका होत असून अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध टाकले आहेत. अमेरिकेची भारताबरोबर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी असल्याचे प्राइस यांनी सांगितले. मतदानापासून दूर राहण्यामागे भारताच्या रणनितीचाही एक भाग आहे. रशिया आणि अमेरिकेशी चांगले संबंध असल्याने युक्रेनच्या मुद्द्यावर कोणत्याही एका बाजूचे थेट समर्थन करणे भारत टाळत आहे.
Russia-Ukrain War: रशिया-अमेरिकेच्या भांडणात भारत-चीनही लक्ष्य..! पहा नेमके काय चालू आहे राजकारणात