Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukrain War Video : म्हणून सूर्यफुलाच्या बिया देऊन रशियन सैन्याला हे सुनावले ‘तिने’..!

Please wait..

कीव : सध्या रशियाने युक्रेन या आपल्याच जुन्या भाऊबंद देशावर हल्ला करून जगाची झोप उडवली आहे. मात्र, आता हुकुमशहा व्लादिमिर पुतीन यांच्या रशियाच्या सैन्याला भिक न घालता युक्रेन येथील राजकीय नेते आणि सामान्य नागरिक आव्हान देत आहेत. एका महिलेने सूर्यफुलाच्या बिया देऊन रशियन सैन्याला सुनावले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

Ukraine World या ट्विटर खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यात ती महिला रशियन सैन्याला सुनावत असल्याचा दावा केला आहे. पोस्टमध्ये म्हटलेय की, हेनिचेस्क, खेरसन प्रदेशात युक्रेनियन महिलेचा रशियन सैनिकांशी सामना झाला. त्यांना ती विचारत होती की ते आमच्या भूमीत का आले? आणि सूर्यफुलाच्या बिया त्यांच्या खिशात ठेवण्याचा आग्रह तिने केला. [जेणेकरून ते युक्रेनियन जमिनीवर मेल्यावर फुले उगवतील]. एकूणच युक्रेनच्या जनतेने आता रशियन सैन्याच्या धमक्यांना भिक न घालता लढण्याची आणि आपला देश टिकवण्याची तयारी केल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply