Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukrain War news : ‘त्या’ देशाचा पुतीन यांना झटका; पहा कोणता महत्वपूर्ण राजकीय निर्णय घेतला आहे

Please wait..

लंडन : युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये भारत आणि चीनने रशियाविरोधातील निषेधाच्या प्रस्तावावरील मतदानात भाग घेतला नाही. या मसुद्यात रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यामध्ये रशियाला युक्रेन बिनशर्त, तात्काळ आणि पूर्णपणे सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारताने या ठरावावरील मतदानात भाग घेतला नाही, परंतु युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करणारे निवेदन जारी करून ते थांबविण्याचे आवाहन केले.

Advertisement
Loading...

याप्रकरणी भारत आणि चीन यांनी रशियाची साथ देण्याचा ‘समजूतदार’ निर्णय घेतला आहे. अशावेळी मध्य अमेरिकन देश ग्वाटेमालाने युक्रेनमधील युद्धावरून रशियाला विरोध केला आहे. यासोबतच त्यांनी रशियामध्ये तैनात असलेल्या आपल्या राजदूतालाही परत बोलावले आहे. ग्वाटेमालाचे अध्यक्ष अलेजांद्रो गियामॅटेई म्हणाले की त्यांचा देश रशियाच्या कृतीचा तीव्र निषेध करतो आणि युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या पाठीशी उभा आहे. मॉस्कोने युक्रेनवरील आपले आक्रमण थांबवावे आणि सर्व सैन्य मागे घ्यावे, असे आवाहन करणारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावर रशियाने व्हेटो केला आहे. शुक्रवारी या ठरावाच्या बाजूने 11 तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विरोधात एक मत पडले. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानापासून दूर राहिले. अल्बेनिया, ब्राझील, फ्रान्स, गॅबॉन, घाना, आयर्लंड, केनिया, मेक्सिको, नॉर्वे, यूके आणि यूएस या देशांसह एकूण 11 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. सुरक्षा परिषदेत हा ठराव मंजूर होऊ शकला नाही कारण त्याला परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाने व्हेटो दिला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply